Eknath Shinde latest news
Eknath Shinde latest news

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचा ‘ब्रेकफास्ट’ पुण्यातील समर्थकांनी केला फस्त

Eknath Shinde : एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (बुधवारी) पुणे दौऱ्यावर येणार आहेत.

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) पुण्यातील बाप्पाच्या दर्शनासाठी येणार असल्याने शिंदे समर्थकांनी जय्यत तयारी केली आहे. अगदी विमानतळापासून मुख्यमंत्री शिंदेंची भेट ठरवलेल्या गणेश मंडळांच्या मांडवापर्यंत सारी व्यवस्था केली आहे. (Eknath Shinde latest news)

सकाळी सव्वाअकरा वाजताच शिंदे येणार असल्याने त्यांच्यासाठी खास ‘ब्रेकफास्ट’ मागवला, पण शिंदेसाहेब काही नियोजित वेळेत पोचले नाहीत आणि सकाळीच विमानतळ गाठलेले कार्यकर्ते कॅन्टीनमध्ये घुसले. मात्र तिथे खाण्यासाठी फारसे पदार्थ नव्हते. त्यामुळे डाएट करणारे शिंदे समर्थक नाना भानगिरे आणि अजय भोसलेंची पंचाईत झाली. तेव्हाच त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांसाठी आणलेला ब्रेकफास्ट घेतला आणि तो फस्त केला.

Eknath Shinde latest news
Cyrus Mistry यांच्या निधनानंतर गडकरींनी घेतला मोठा निर्णय ; फाइलवर केली सही

मुख्यमंत्री शिंदे आता मुंबईतून निघत असल्याने त्यांच्यासाठी पुन्हा ब्रेकफास्ट आणि तो ठाण्यातून आलेल्या मुख्यमंत्री शिंदेंच्या गाडीत ठेवला आहे. त्यानंतर भानगिरे,भोसले, किरण साळी आणि रमेश कोंडे स्वागतासाठी तयार झाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (बुधवारी) पुणे दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शहरातील प्रमुख गणेश मंडळांना भेट देणार आहेत. असून फडणवीस पुरंदर तालुक्यातील भिवडी येथील आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या पुणे दौऱ्यामुळे शिंदे गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.

दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ, अखिल मंडई गणेशोत्सव मंडळ, कसबा पेठ, त्वष्टा कासार, तरूण अशोक मंडळ,तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, केसरीवाडा, यशवंतनगर गणेशोत्सव मंडळ, साई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आदी गणेशमंडळांना एकनाथ शिंदे भेट देणार आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुरंदर तालुक्यातील भिवडी येथील आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक स्मारकाला भेट देणार आहेत. त्यानंतर नाईक यांच्या जयंती सोहळ्यासही ते उपस्थित राहणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com