‘छत्रपती’चे त्यावेळचे संचालक घरून दशम्या आणायचे आणि एकत्र बसून जेवायचे!

छत्रपती साखर कारखान्याने उसाला किती दर दिला आहे.
‘छत्रपती’चे त्यावेळचे संचालक घरून दशम्या आणायचे आणि एकत्र बसून जेवायचे!
Sharad PawarSarkarnama

वालचंदनगर (जि. पुणे) : इंदापूर तालुक्यात पाऊस झाला का?, छत्रपती कारखान्याने किती भाव दिला आणि तालुक्यातील इतर साखर कारखान्यांनी किती भाव दिला? कोराेनाचे प्रमाण कमी झाले आहे का? असे प्रश्‍न विचारत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शेती व विशेषतः उसाच्या भावासंदर्भातील माहिती जाणून घेतली. पवारांची शेतीशी नाळ किती घट्टी जोडली आहे, याचा अनुभव लासुर्णे येथील नागरिकरांनी घेतला. (Chhatrapati Sugar Factory's How much did Rate for sugarcane : Sharad Pawar)

इंदापूरचे माजी सभापती बाबासाहेब शंकरराव पाटील (वय ९४) यांचे गेल्या महिन्यात निधन झाले आहे. शरद पवार यांनी गुरुवारी (ता. ७ आक्टोबर) लासुर्णे गावात येऊन पाटील कुटुंबीयांची भेट घेऊन आपल्या सहकाऱ्याच्या आठवणींना उजाळा दिला. पवार यांनी या वेळी छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या आठवणी कथन केल्या.

Sharad Pawar
आम्हीच सरकारला ७२ तासांचे अल्टीमेटम देतो ; शेतकऱ्यांना मदत द्या, अन्यथा..

पवार म्हणाले की, छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संस्थापक संचालक मंडळातील बहुतांश सर्व संचालक हे फेटे घालत होते. कारखान्याची उभारणी सुरु असताना झाडाखाली बसून कामकाजावर लक्ष ठेवत होते. त्यावेळी संचालक घरून दशम्या घेऊन येत असत आणि कारखान्याचे काम पाहत एकत्र बसून जेवण करीत होते. त्यावेळी साहेबराव जाचक हे छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष होते. बाबासाहेब पाटील यांनीही कारखान्याचे संचालक म्हणून अत्यंत सचोटीने काम पाहिल्याची आठवण पवार यांनी या वेळी सांगितली.

Sharad Pawar
'दौंड शुगर्स'सह राज्यातील पाच कारखान्यांवर छापे

छत्रपती साखर कारखान्याने यंदा उसाला किती भाव दिला आहे, याची चौकशी करून आणखी किती पैसे देणे बाकी आहेत, तसेच इंदापूर तालुक्यातील इतर सहकारी साखर कारखान्यांनी उसाला किती भाव दिला, याचीही विचारपूस ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे का? उसाचे पिक कसे आहे, कोरोना कमी झाला आहे का? पूर्वी कोरोनाची परिस्थिती काय होती, तालुक्यात किती कोविड सेंटर सुरू आहेत का? याचीही विचारणा पवार यांनी आस्थेवाईकपणे केली. पवार यांची नाळ शेती आणि शेतकऱ्यांशी किती घट्ट जोडली आहे, याचा अनुभव लासुर्णे येथील नागरिकांनी आज पुन्हा एकदा घेतला. या वेळी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, हेमंतराव पाटील, अॅड. तेजसिंह पाटील, डॉ. योगेश पाटील, रामभाऊ पाटील, सरपंच सागर पाटील आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.