Baramati : इंडियन एअर फोर्सच्या ‘चेतक’चे बारामतीत अचानक लॅंडिंग!

या हेलिकॉप्टरमध्ये पायलट सह चार व्यक्तींचा समावेश होता
Chetak Helicopter
Chetak HelicopterSarkarnama

माळेगाव (जि. पुणे) : बारामती (Baramati) तालुक्यातील खांडज- निरावागज रस्त्याच्या उजव्या बाजूस हनुमंत ज्ञानदेव आटोळे यांच्या शेतात आज (ता. १ डिसेंबर) सकाळी दहाच्या सुमारास अचानकपणे हेलिकॉप्टरचे लँडिंग झाले.  तांत्रिक बिघाड झाल्याने इंडियन एअर फोर्सचे (Indian Air Force) चेतक हेलिकॉप्टर (Helicopter) महिला पायलट गायत्री यांना इमर्जन्सी लँडिंग करावे लागले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये पायलट सह चार व्यक्तींचा समावेश होता, अशी माहिती बारामतीचे पोलिस निरीक्षक किरण अवचार यांनी दिली.  (Chetak helicopter of Indian Air Force makes sudden landing in Baramati)

बारामती तालुक्यातील खांडज गावामध्ये अचानकपणे हेलिकॉप्टरचे लँडिंग झाल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या पार्श्वभूमीवर माळेगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन संबंधित हेलिकॉप्टर, पायलट व त्यांच्या इतर साथीदारांना सुरक्षितता पुरवली.

Chetak Helicopter
Adv. Gunaratn Sadavarte : ॲड. सदावर्तेंनी स्थापन केलेला एसटी कष्टकरी जनसंघ फुटीच्या मार्गावर

बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनीही घटनास्थळी भेट देऊन प्राप्त स्थितीची पाहणी केली. दरम्यानच्या कालावधीत इंडियन एअर फोर्सचे दुसरे हेलिकॉप्टर मदतीसाठी घटनास्थळी आले असून युद्ध पातळीवर नादुरुस्त हेलिकॉप्टरचा तांत्रिक बिघाड काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Chetak Helicopter
Gram Panchayat Election : इच्छुकांनी मानले अजितदादांचे आभार ; निवडणूक आयोगाकडून मोठा बदल

दरम्यान, गेल्या वर्षी एक खासगी हेलिकॉप्टर शेजारच्याच इंदापूर तालुक्यात कोसळले होते. त्यामध्ये एक शिकाऊ पायलट युवती जखमी झाली होती. आता तांत्रिक बिघाडामुळे इंडियन एअर फोर्सचे चेतक हेलिकॉप्टर बारामती तालुक्यातील खांडज परिसरात उतरावे लागले आहे. तांत्रिक बिघाडाची माहिती घेऊन ते दुरुस्त करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com