राज्य सरकारने स्थगित ठेवलेला नदी सुधार प्रकल्प सुरू करण्याचा चंद्रकांतदादांचा आग्रह

‌ नदी सुधार प्रकल्पासाठीच्या सर्व परवानग्या मिळाल्या असतानाही हा प्रकल्प का रखडला असा सवाल त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केला.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama

पुणे : पुणे महापालिकेच्या (PMC) सर्वसाधारण सभेने रद्द केलेला बावधन परिसरातील कचरा‌ संकलन केंद्र सुरू करण्यास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी विरोध दर्शविला आहे. नागरिकांनी उपस्थित केलेल्या समस्यांचे पूर्ण समाधान होत नाही तोपर्यंत हा प्रकल्प उभारण्यात येऊ नये, अशी भूमिका पाटील यांनी आज महापालिका आयुक्त विक्रमकमार (Vikramkumar) यांच्याकडे मांडली.

Chandrakant Patil
भंडारा भाजपमध्ये गटबाजीने आग : बावनकुळेंचा बंब रवाना...

‌ नदी सुधार प्रकल्पासाठीच्या सर्व परवानग्या मिळाल्या असतानाही हा प्रकल्प का रखडला असा सवाल त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केला.कोथरूडसह पुण्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पाटील यांनी आज आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. प्रामुख्याने बावधनमधील कचरा प्रकल्प, बालभारती-पौड फाटा रस्त्याचे काम, २३ गावातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न, रामनदीचा समावेश असलेला नदी सुधार प्रकल्प, शहरातील प्रस्तावित उड्डाणपूलाचे नियोजन यांसह विविध विषयांचा समावेश होता.

Chandrakant Patil
मोठी बातमी : द्रेशद्रोहाच्या कायद्यात बदल होणार? मोदी सरकारचा दोन दिवसांतच यू-टर्न

पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत रद्द करण्यात आलेला कोथरूड मधील बावधन कचरा प्रकल्प पुन्हा उभारण्यात येत आहे. या प्रकल्पास स्थानिकांचाही विरोध आहे. तसेच नगरविकास खात्याकडून विखंडनाचा अभिप्राय आलेला नसताना हा प्रकल्प उभारण्याचा अट्टाहास का? असा सवाल त्यांनी आयुक्तांना विचारला. त्यावर बावधनमधील प्रकल्प हा ट्रान्झिट स्टेशन म्हणजे तात्पुरत्या स्वरुपातील कचरा संकलन केंद्र असल्याचे स्पष्टीकरण दिले. पण रामनदीच्या शुद्धीकरणावर याचा परिणाम होणार असल्याने हा कचरा प्रकल्प उभारु नये, अशी भूमिका ‌पाटील यांनी मांडली.आयुक्तांनी स्वतः प्रत्यक्ष भेट घेऊन नागरिकांनी उपस्थित केलेल्या समस्या जाणून घेऊन, त्यांवर उपाययोजना करण्याचे मान्य केले.

Chandrakant Patil
धुडगुस घालायला अक्कल लागत नाही... अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

पुणे महापालिकेत समाविष्ट २३ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. पण तरीही त्याची अंमलबजावणी का होत नाही? असा प्रश्न पाटील यांनी यावेळी बैठकीत उपस्थित केला. त्यावर आयुक्तांनी बांधकाम व्यावसायिकांकडून उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राचा आधार घेऊन, सध्या पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी बांधकाम व्यावसायिकांची असल्याचे नमुद केले. या गावांमध्ये एक दिवसाने पाणीपुरवठा होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे या भागांमध्ये पाणीपुरवठा दररोज करण्याची मागणी केली. त्यावर बैठक घेऊन निर्णय‌ घेण्याचे आयुक्तांनी मान्य केले.

कोथरुड मधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या बालभारती-पौड रस्त्याचे‌ काम अद्याप का सुरू झाले नाही? असा प्रश्‍न पाटील यांनी आयुक्तांसमोर उपस्थित केला. त्यावर आयुक्तांनी त्याचा विकास आराखडा लवकरच तयार करण्यात येत असल्याचे सांगितले. मात्र, या प्रकल्पास काही पर्यावरणप्रेमींनी आक्षेप घेतला असल्याचे पाटील यांनीही सांगितले. त्यावर त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आयुक्तांनी मान्य केले.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com