चंद्रकांतदादा : मी कधीच कुठला खटला हारलो नाही

शिवसैनिकाची किंमत कुणीच करू शकत नाही. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी केलेली किंमत त्यांना महागात पडणार आहे.

Chandrakant Patil, Sanjay Raut
Chandrakant Patil, Sanjay Rautsarkarnama

पुणे : शिवसैनिकाची किंमत कुणीच करू शकत नाही. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी केलेली किंमत त्यांना महागात पडणार आहे. आतापर्यंतच्या राजकारणात की कधीच हारलेलो नाही. त्यामुळे मानहानीच्या दाव्यात चंद्रकांत पाटल यांची हार निश्‍चित असून त्यांना जाहीरपणे सव्वा रूपया मला द्यावा लागेल, असा विश्‍वास शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज पुण्यात व्यक्त केला.

पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातील मेळाव्यात बोलताना खासदार राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासह विरोधकांवर टीका करीत चिमटे काढले. ते म्हणाले, ‘‘ आपण राज्यात सत्तेत आहोत. दिल्लीतही सत्तेचे आपले स्वप्न आहे. गुजरातचा मुख्यमंत्री देशाचा पंतप्रधान होऊ शकतो तर देशात एक क्रमांकाचे राज्य आणि एक क्रमांकाचे मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरेदेखील पंतप्रधान होऊ शकतात.’’


Chandrakant Patil, Sanjay Raut
आमदार काबळेंचा खुलासा; ‘ती’ क्लिप माझी नाहीच पोलीस तपासात सत्य समोर येईल

खासदार राऊत म्हणाले, ‘‘ राज्यात आपण सत्तेत आहोत.देशात सत्तेत येण्याचे स्वप्न पाहात आहोत.मात्र, पुणे महापालिकेत सत्तेत येण्याची तयारी आपण करायला हवी. पुणे हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी महत्वाचे शहर होते. मुंबईनंतर त्यांचे पुण्यावर अधिक प्रमे होते.त्यांचा जन्म पुण्यातलाच. त्यामुळे या शहरात आपली सत्ता येण्याची गरज आह. राज्यात महाविकास आघाडीबरोबर सत्तेत आहोत.पुण्यातही आघाडीची चर्चा करू.जमलं नाही तर एकला चलो आहेच. मात्र, कोणत्याही परिस्थितीत पुण्यात आपल्याशिवाय कुणाचाही महापौर होऊ शकणार नाही याची काळची घ्यायला हवी.’’


Chandrakant Patil, Sanjay Raut
...आणि आमदार सुनील कांबळेंचा फोन झाला ‘स्विच ऑफ’

संपूर्ण पुणे जिल्ह्यात आता नव्या ताकदीने संघटन उभं राहण्याची गरज आहे. अगदी बारामतीतदेखील आपली संघटना मजबूत व्हायला हवी. कदाचित तिथे आपण जिंकणार नाही. मात्र, संघटना मजबूत होण्यास मदत होईल, या दृष्टीने काम करण्याची गरज आहे, असे खासदार राऊत यांनी सांगितले.पुणे महापालिका निवडणूक जिंकण्याच्या तडफेने कामाला लागा, असे आवाहन करीत पुण्यात १० जागांच्यावर आपण कधी पोचलो नाही अशी खंत राऊत यांनी बोलून दाखविली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com