Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama

Chandrakant Patil : महापालिका निवडणुकांबाबत चंद्रकांतदादांचे मोठे विधान; म्हणाले...

Chandrakant Patil News: राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकाबाबत चंद्रकांत पाटील यांच मोठ विधान

प्राची कुलकर्णी

Municipal Elections News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात  (Supreme Court) सुरू आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार, याबाबत नेहमी चर्चा होतांना दिसते, यावर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी साम टिव्हीशी बोलतांना “ राज्यातील महानगरपालिकेची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होणार आहे." अशी प्रतिक्रिया दिली.

Chandrakant Patil
Dhule APMC election News : निवडणुकीत काँग्रेस, भाजपची लोकसभेसाठी चाचपणी!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून कोणताही ठोस निर्णय न्यायालयात होऊ शकलेला नाही. न्यायालयाची पुढील सुनावणी 10 एप्रिल रोजी पार पडणार आहे. रखडलेल्या निवडणुकांसंदर्भात पाटील म्हणाले “सुप्रीम कोर्ट 'मे' महिन्याच्या सुट्टी आधी निर्णय घेईल. त्यानंतर पावसाळ्यानंतर प्रभाग रचना आणि त्यानंतर साधरण ऑक्टोबरमध्ये महापालिका निवडणूक होईल,'

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात गेली आठ महिने 'तारीख पे तारीख' सुरु आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या प्रकरणाच्या सुनावणीसाठी नव्यानं तारखा दिल्या जात आहेत. 92 नगरपरिषदांमध्येही ओबीसी आरक्षण लागू व्हावं, बदललेल्या वॉर्ड रचनेला दिलेलं आव्हान या गोष्टी कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या असल्यानं निवडणुका खोळंबल्या आहेत. ओबीसी राजकीय आरक्षणाला मंजुरी दिलेली आहे, 92 नगरपरिषदांसाठी केवळ निवडणूक आयोगाला आदेश द्यायचं काम बाकी आहे, असं गेल्या वेळी वकीलांनी कोर्टात सांगितलं होतं. 

Chandrakant Patil
Rahul Gandhi News : राहुल गांधी यांना देऊ केले अयोध्येच्या हनुमानगढीतील घर!

महापालिका निवडणुका आता पावसाळ्यानंतरच?

सर्वोच्च न्यायालयानं मविआ सरकारची वॉर्डरचना मान्य केली तर कदाचित निवडणुकांचा मार्ग मोकळा होईलही. पण 23 महानगरपालिका, 207 नगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, 284 पंचायत समिती अशा सगळ्या निवडणुका घ्यायच्या आहेत.  त्यामुळे निवडणूक आयोग त्या दोन टप्प्यांत घेऊ शकतं, काही पावसाळ्याआधी आणि काही पावसानंतर... दुसरी शक्यता म्हणजे, जर शिंदे सरकारची वॉर्डरचना न्यायालयानं मान्य केली तर मग नव्यानं प्रक्रिया करण्यासाठी निवडणूक आयोगाला काही काळ लागेल. त्यामुळे या निवडणुका पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता आहे. मुंबई- पुण्यासारख्या महापालिका निवडणुका या ऑक्टोबरमध्ये होऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका याआधी कोरोनामुळे, नंतर ओबीसी राजकीय आरक्षणामुळे आणि आता सत्ताबदलामुळे रखडल्या. महत्त्वाचे म्हणजे, याच निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालय मागच्या मे महिन्यात खूप आग्रही होतं. निवडणुका तातडीनं व्हायला हव्यात, अगदी पावसाळ्यातही निवडणूका घ्यायला काय हरकत आहे, असा सर्वोच्च न्यायालयाचा सवाल होता. त्यामुळे आता निवडणुका कधी होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com