चंद्रकांत पाटलांचा दुचाकीवरून विनाहेल्मेट प्रवास; सोशल मीडियावर होताहेत ट्रोल

Chandrakant Patil : मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाहतूक पोलिसाच्या गाडीवरून प्रवास केला.
Chandrakant Patil Latest News
Chandrakant Patil Latest News Sarkarnama

पुणे : गेली दोन वर्ष कोरोनामुळे गणेशोत्सव गणेश भक्तांना जल्लोषात साजरा करता आला नव्हता. मात्र यंदा कोरोनाचे सावट कमी झाल्याचे शासनाकडुन कुठलेही निर्बंध ठेवण्यात आलेले नाहीत. यामुळे देशभरात आणि विशेषत: महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धूम असून जल्लोष बघायला मिळत आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून ते शाळकरी मुलांपर्यंत गणपतीच्या आगमनाची यंदा जोरदार तयारी केल्याचे दिसत आहे.

दरम्यान नव्या सरकारमधील उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही आज (ता.३१ ऑगस्ट) पुण्यातील मानाच्या गणपतीचे दर्शन घेतले. ट्रॅफिकमुळे त्यांनी थेट ट्रॅफिक पोलिसाच्या गाडीवरून प्रवास केला आहे. मात्र, त्यांनी हा प्रवास करत असतांना विनाहेल्मीट प्रवास केल्याने त्यांच्यावर टीका होत असून सोशल मिडियावर त्यांना ट्रोल केलं जात आहे. (Chandrakant Patil Latest News)

Chandrakant Patil Latest News
सोलापूरात मशरूम गणपती मंदिराचा २८ तोळ्याचा कळस चोरीला...

पुण्यातील रस्त्यावरील गर्दी लक्षात घेऊन वाहनांचा ताफा टाळत चंद्रकांत पाटलांनी एका ट्रॅफिक पोलिसांच्या मोटरसायकलवर मागे बसून प्रवास केला आहे. त्यांनी पुण्याचं ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीचे दर्शन घेतलं. त्यानंतर भाऊ रंगारी गणपतीच्या प्रतिष्ठापणेसाठी ते जाण्यासाठी निघाले होते. मात्र रस्त्यावरील गर्दी पाहता त्यांनी वाहनांचा ताफा टाळत एका ट्रॅफिक पोलिसाच्या मोटरसायकलवर बसून प्रवास केला. मात्र यावेळी त्यांनी हेल्मेट घातले नाही. यावरून त्यांना सोशल मिडियावर ट्रोल केलं जात आहे. यानंतर त्यांनी विनाहेल्मेट प्रवास केल्याने दिलगिरी व्यक्त करत, यापुढे विना हेल्मेट प्रवास करणार नसल्याची कबुलीही दिल्याची माहिती मिळत आहे.

Chandrakant Patil Latest News
मी आणि मुख्यमंत्री शिंदे निष्ठावान शिवसैनिक, त्यांनी दसरा मेळावा घ्यावा...

दरम्यान, यंदा गणेशोत्सवावरील निर्बंध हटवून शिंदे-फडणवीस सरकारने गणेश भक्तांना जल्लोषात मात्र काळजीपूर्वक सण साजरा करण्याचं आवाहन केले आहे. त्यानंतर राज्य शासनाने ३१ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाकरीता राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य विभागामार्फत घेण्यात आला आहे. राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकास पाच लाख रूपये, द्वितीय क्रमांकास रुपये दोन लाख ५० हजार आणि तृतीय क्रमांकास रुपये एक लाख रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मंडळांना गौरविण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in