चंद्रकांत पाटील म्हणतात;पेट्रोल-डिझलचे दर आधी राज्याने कमी करावेत

महाविकास आघाडी सरकारनेही महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलवरील राज्य सरकारचा कर कमी करून जनतेला दिलासा द्यावा.
chandrakant.jpg
chandrakant.jpg

पुणे : राज्यातल्या आघाडी सरकारने पेट्रोल-डिझलचे दर कमी करण्याची मागणी केंद्राकडे करण्याआधी राज्याच्या पातळीवर कमी करून दाखवावेत असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पुण्यात बोलताना दिले. स्वतः काही करायचे नाही आणि प्रत्येक गोष्ट केंद्र सरकारने केली पाहिजे, अशी अपेक्षा राज्य सरकार करीत आहे, अशी टीका पाटील यांनी केली.(Chandrakant Patil says; State should reduce petrol-diesel rates first) 

पेट्रोल डिझलच्या बाबतीत आयातीचा दर, प्रक्रियेचा खर्च, वाहतूक खर्च आणि वितरकांचे कमिशन यामध्ये बदल होऊ शकत नाही. त्यावरील करांमध्ये फक्त बदल होऊ शकतो. अन्य राज्यांनी कर कमी केल्याने तेथे शंभरच्या आत दर आहे. महाविकास आघाडी सरकारनेही महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलवरील राज्य सरकारचा कर कमी करून जनतेला दिलासा द्यावा. या सरकारने स्वतः कर कमी करून मग केंद्राला आवाहन केले तर त्याला अर्थ आहे, असे पाटील यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, ‘‘ कोरोना संकट, मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण, अनुसूचित जाती जमातींचे पदोन्नतीमधील आरक्षण अशा प्रत्येक बाबतीत उद्धव ठाकरे सरकारमध्ये गोंधळ असतो. तसाच प्रकार कोरोनाविषयी निर्बंधांबाबत होत आहे. या सरकारने सर्वांशी विचार विनिमय करून निश्चित दिशा ठरविण्याची गरज आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी संघर्षाची भूमिका स्वीकारली आहे. त्यांच्या भूमिकेला भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा असून मराठा समाजाचे प्रश्न सुटण्यासाठी पक्ष संभाजीराजेंना पूर्ण ताकदीने पाठबळ देईल, याचा पाटील यांनी पुनरुच्चार केला.
Edited By : Umesh Ghongade

भाजपाच्या एका सदस्याने पुण्यात पीएमपीएलच्या संचालकपदाचा राजीनामा देण्यावरून निर्माण झालेला तांत्रिक पेच सुटला आहे. भाजपाच्या एका पक्षांतर्गत बाबीचे भांडवल करण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्यावे, असे ते म्हणाले.कोरोनाच्या लशीच्या उत्पादनाची स्थिती सुधारत असून महिनाअखेर लस बऱ्यापैकी सर्वत्र उपलब्ध होईल, असा विश्‍वास पाटील यांनी व्यक्त केला.
---------------------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com