चंद्रकांत पाटील म्हणतात; शरद पवारांना आता मुख्यमंत्री होण्याची घाई

राज्यात महाआघाडीचे सरकार अस्तित्वात आहे असे वाटत नाही.कारण कोणतेही काम योग्य पद्धतीने होत नाही.
चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील सरकारनामा

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : गेल्या काही दिवसात ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) ज्या पद्धतीने सक्रीय झालेत ते पाहता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeary) यांच्या जागी शरद पवार यांनाच मुख्यमंत्री होण्याची घाई झाल्याचे दिसत आहे,असा आरोप भारतीय जनता पार्टीचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज केली.पवार यांना घाई झाली असली तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापैकी कुणालाच मुख्यमंत्रीपदाची खुर्ची देणार नाहीत, असे पाटील यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील
‘सरकारनामा’ औंध-बोपोडीत : आमदार-खासदार काळे की गोरे दोन वर्षांत पाहिलेच नाहीत!

पत्रकारांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, ‘‘ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्बेत बरी नसल्यने त्यांची जागा घेण्यासाठी त्यांच्या घरातील व्यक्तींची नावे अधून-मधून चर्चेत येत आहेत.या पाश्‍र्वभूमीवर विविध विषयात ज्येष्ठ नेते शरद पवार हे सक्रीय होताना दिसत आहेत. यावरून पवार यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्याची घाई झाल्याचे स्पष्ट होत आहे.पवार यांची तयारी दिसत असली तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कुणावरच विश्‍वास नाही. अजित पवार यांच्यावर तर मुख्यमंत्री ठाकरे यांचा अजिबात विश्‍वास नाही.राज्याच्या प्रत्येक विषयात ठाकरे सरकारला पवार यांचे मार्गदर्शन घेण्याची गरज पडत असल्याचे दिसत असून शिवसेनेवर इतकी वाईट वेळ यापूर्वी कधीही आली नव्हती.’’

चंद्रकांत पाटील
पुणे पालिका : १४ मार्चपूर्वी निवडणुका जाहीर न झाल्यास प्रशासक येणार ?

राज्यात महाआघाडीचे सरकार अस्तित्वात आहे असे वाटत नाही.कारण कोणतेही काम योग्य पद्धतीने होत नाही. तीन महिने चालेला एसटी कामगारांचा संप राज्य सरकारला मिटविता आला नाही. एकिकडे एसटी कामगारांवर कारवाईची कुऱ्हाड चालविण्यात येत आहे तर दुसरीकडे एसटी बंद असल्याने सामान्य लोकांचे कमालीचे हाल होत आहेत. मात्र, सरकार कोणताच मार्ग काढालयला तयार नाही. त्याचा फटका एसटी कामगार व राज्यातील सर्वसमान्य जनता या दोघांनाही बसत आहे,असे पाटील यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशात शिवसेना निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहे. वास्तविक राज्याबाहेरील निवडणुकांचा शिवसेनेचा अनुभव वाईट आहे. प्रत्येक वेळी तोंडावर पडून सुद्धा पुन्हा तेच करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होत असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.निवडणुका लढवून राष्ट्रवादी कॉंग्रेस एखादी जागा मिळविते. मात्र, शिवसेना निवडणुका लढवून पुन्हा-पुन्हा अपयश पदरात घेत आहे, अशी टीका पाटील यांनी केली.गोवा आणि उत्तर प्रदेशात भाजपाला अडचण नाही. मात्र, पंजाबमध्ये आमच्यासाठी निवडणूक सोपी नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in