राबडीदेवी म्हटले, फुलनदेवी नव्हे; गजारियांच्या ट्टिटचे चंद्रकांत पाटलांकडून समर्थन

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी आणि नेत्यांनी महिलांबद्दल काहीही बोलले तरी चालते.
राबडीदेवी म्हटले, फुलनदेवी नव्हे; गजारियांच्या ट्टिटचे चंद्रकांत पाटलांकडून समर्थन
Chandrakant Patilsarkarnama

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर सोशल मीडियातून केलेल्या टिकेवरुन सध्या वाद सुरु आहे. भाजपचे (BJP) महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी गजारियायांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.

पाटील पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, एकंदरीत माझा तो बळवंतराव दुसऱ्यांचा तो बाब्या, असे महाविकास आघाडीचे चालले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी आणि नेत्यांनी महिलांबद्दल काहीही बोलले तरी चालते. त्यांनी पंतप्रधानांवर टीका केली तरी चालते. मात्र, भाजपमधील मंत्र्यांनी एक शब्द जरी बोलला तरी त्यांच्यावर कारवाई होते. गजारिया यांनी रश्मी ठाकरे यांना राबडीदेवी म्हटले होते, फूलन देवी नाही, तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, राबडीदेवी शिवी नाही, असे पाटील यांनी सांगितले.

Chandrakant Patil
पुण्यात कोरोनाचा कहर : दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी

गजारिया यांनी रश्मी ठाकरेंना राबडीदेवी म्हटले यात काहीच गैर नाही. लालूप्रसाद यादव तुरुंगात गेल्यानंतर राबडीदेवी मुख्यमंत्री झाल्या. त्यांनी राज्य सांभाळले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नाही. त्यामुळे रश्मी ठाकरे या देखील राबडीदेवी यांच्याप्रमाणे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळू शकतात, त्यामुळे राबडीदेवी म्हणून गजारिया यांनी रश्मी ठाकरेंना उपमा दिली, फूलनदेवी म्हटलेले नाही. त्यामुळे वाईट वाटून घेण्याचे कारण नाही, याप्रकरणी आम्ही त्यांना समज दिली. भाजपची महिलांबद्दल योग्य शब्दांत बोलण्याची संस्कृती आहे, असेही पाटील म्हणाले.

''काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पंतप्रधान मोदींना नौटंकी म्हणालेत, तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. पंजाब घटनेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा हात होता, असा आरोप केला, त्यामुळे पटोलेंविरोधात वॉरंट काढून अटक करा, अशी मागणी पाटील यांनी केली.

Chandrakant Patil
शिवसेनेची ११०० मते तरीही मी आमदार झालो : शहाजी पाटलांनी सांगितले विजयाचे गणित

प्रकरण काय?

गजारिया यांनी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात ट्वीट करताना 'महाराष्ट्राची राबडी देवी' असे शब्द वापरले होते. गजारिया यांच्या या आक्षेपार्ह ट्वीटवर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवत त्यानंतर सायबर पोलिसांत तक्रार केली होती. या ट्वीटवरुन सायबर पोलिसांनी गजारिया यांना नोटीस पाठवत जबाब नोंदवून घेतला. दरम्यान हे ट्वीट नंतर जितेन गजारिया यांनी डिलीट केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in