चंद्रकांत पाटील म्हणाले; पुण्यात कुणी-किती जागा लाटल्या दोन दिवसात आकडे बोलणार

शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या पुण्यातील लोकप्रतिनिधींनी ॲमिनिटीच्या किती जागा लाटल्या हे येत्या दोन दिवसात जाहीर करणार
cpatil.jpg
cpatil.jpg

 पुणे : ॲमिनिटी स्पेसवरून विरोधक राजकारण करीत आहेत. या पाश्‍र्वभूमीवर शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या पुण्यातील लोकप्रतिनिधींनी ॲमिनिटीच्या किती जागा लाटल्या हे येत्या दोन दिवसात जाहीर करणार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले.(Chandrakant Patil said; In Pune, will talk about numbers in two days about aminity space) 

तीन्ही पक्षांच्या नेत्यांनी लाटलेल्या जागा ताब्यात घेऊन आतापर्यंतची भाड्याच्या रकमेची वसुलीदेखील करण्यात येणार असल्याने पाटील यांनी यावेळी सांगितले.ॲमिनिटी स्पेसच्या नावाखाली जागा मोकळ्या ठेऊन त्यावर झोपड्या उभारण्याचा व त्यावर पुन्हा ‘एसआरए’ उभारण्याचा डाव असतो.मुळात या जागा सार्वजनिक वापरासाठी आहेत. मात्र, त्याचा दुरूपयोग केला जात आहे. कॉंग्रेस, रष्ट्रवादी व शिवसेना यावरून राजकारण करीत आहेत. 

बांधकाम करण्यात येणाऱ्या भूखंडाच्या १५ टक्के असणारी ही जागा स्थानिक स्वराज्य संस्थांना ॲमिनिटीच्या स्वरूपात देण्यात येते. या जागावेर मैदाने, रूग्णालये, शाळा, समाजमंदिर, यासह सार्वजनिक वापराच्या सुविधा या जागांवर निर्माण करण्यात येतात.चांगल्या भूमिकेतून निर्माण करण्यात आलेल्या तरतुदीचा काहीजण चुकीचा वापर करण्याचा प्रयत्न करीत आहेत.पुण्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या काही लोकप्रतिनिधींनी गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकारे जागा बळकावल्या आहेत.या जागा संबंधितांकडून काढून घेतल्या जातील तसेच या जागांचे थकलेले भाडे वसूल करण्यात येईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले. 

ॲमिनिटी स्पेसच्या बाबतीत बिल्डर धार्जिना निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. १५ टक्के ऐवजी पाच टक्के ॲमिनिटी स्पेस ठेवण्याचा नवा नियम राज्य सरकारने केला असून हा निर्णय केवळ बिल्डरांचे हित समोर ठेऊन केल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. या निर्णयात तातडीने बदल करून पूर्वीप्रमाणे १५ टक्के जागेचा नियम कायम ठेवावा, असे पाटील यांनी सांगितले. 

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com