patil-patil.jpg
patil-patil.jpg

चंद्रकांत पाटील म्हणाले; जयंतराव हे वागणं बरं नाही

चांगले काम करणाऱ्या विरोधकाला त्रास देण्याची परंपरा राजारामबापू पाटील यांची नाही.

पुणे : कोरोना काळात चांगले काम करणाऱ्या इस्लामपूरच्या प्रकाश हॉस्पिटलला जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. निशिकांत पाटील हे जयंत पाटील यांचे राजकीय विरोधक आहेत म्हणून त्यांना जाणीवपूर्वक त्रास देणे बरोबर नाही. जयंत पाटील याचा विचार करतील, अशी मला आशा आहे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केले.Chandrakant Patil said; It is not good to behave like Jayantrao

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील कोरोना काळत चांगले काम करणाऱ्या रूग्णालयाला राजकीय भूमिकेतून त्रास देत आहेत, असा आरोप केला. ते म्हणाले, ‘‘ इस्लामपूर या गावात भाजपाचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचे रूग्णालय आहे. या रूग्णालयात सहाशे रूग्णांची क्षमता आहे. त्यासाठी आवश्‍यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून परवानगी मिळविली आहे. मात्र, त्यांना केवळ शंभर रूग्णांची परवानगी दिली आहे. आता रूग्णालयाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात स्वत:हून पुढे येणाऱ्या रूग्णालयांना मदत करण्याऐवजी त्रास देण्याचा प्रकार अशोभनीय आहे. केवळ राजकीय विरोधक आहेत. इस्लामपूर नगरपालिकेची सत्ता जयंतरावांच्या हातातून हिसकावल्याने अशाप्रकारे त्रास देणे योग्य नाही.

चांगले काम करणाऱ्या विरोधकाला त्रास देण्याची परंपरा स्वर्गीय राजारामबापू पाटील यांची मुळीच नाही. खरेतर जयंत पाटील यांचीही नाही. मात्र, आता ते खालच्या पातळीवर जाऊन त्रास देत आहेत. असे करणे योग्य नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले. निशिकांत पाटील यांची काही चूक असेल तर चौकशी करायला हरकत नाही. मात्र, काहीच चूक नसताना चांगले काम करणाऱ्या रूग्णालयास त्रास देणे योग्य नसल्याचे पाटील यांनी सांगितले


निशिकांत पाटील हे इस्लामपूरचे नगराध्यक्ष आहेत. ते भाजपाचे स्थानिक नेते आहेत. स्थानिक राजकारणातून हा वाद सुरू झाला असून त्यातून पाटील यांच्या रूग्णालयाची चौकशी सुरू करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com