
Pimpri Chinchwad News : राज्याचे मंत्री व पुण्याचे पालकमंत्री आज पिंपरी चिंचवड शहरात होते. आमदार महेश लांडगे यांच्या एका कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. शहराचं विकास आणि व्यवस्थापन या विषयावर त्यांनी भाष्य करत, पिंपरी चिंचवडकरांना आवाहन ही केले. दरम्यान आमदार महेश लांडगे यांनी शहराच्या विकासाबाबत काही मागण्या केल्या होत्या,तसेच पुणे जिल्हा विभाजन व्हावे, अशी मागणी लांडगे यांनी केली होती.
चंद्रकांत पाटील म्हणाले, "मला महेश लांडगे (Mahesh Landge) यांचं भाषण ऐकताना वाटलं, ते वेगवेगळ्या मागणी करताना मुंबईचा समुद्रही पिंपरीला द्या, अशी मागणी करतात की काय? परंतु लोकप्रतिनिधी तोच जे समाधानी असतो. लोकप्रतिनिधी जेव्हा समाधानी होतो, तेव्हा विकास संपतो. पिंपरी चिंचवडचा वाढणार विस्तार पाहता, कुठलीही गोष्ट पूर्ण होणारी नाही. मी पालकमंत्री म्हणून सर्वांना शब्द देतो की, जे जे विषय येतील, ते पूर्ण करूच."
"परवाच काही प्रकल्पग्रस्तांनी शहराचं पाणी थांबवलं होतं, त्याबाबतीत त्यांना मी आश्वस्त केलं. वाढत्या शहरामध्ये जशी सरकारची विकासाची जबाबदारी आहे. पाणी, कचऱ्याचं व्यवस्थापन, रस्ते, सुरक्षा याबाबत प्रशासनाची जशी जबाबदारी आहे,तशी ती नागरिकांची ही जबाबदारी आहे," असेही चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.