राज्यात भाजपचे सरकार येणार का? चंद्रकांतदादा म्हणतात, ‘काशीस जावे नित्य वदावे!’

महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षपूर्तीवर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी टीका केली आहे.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama

पुणे : राज्यात महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) स्थापन होवून दोन वर्ष पुर्ण झाले आहे. मात्र, विरोधक असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या (BJP) वतीने सातत्याने महाविकास आघाडी सरकार पडणार आणि भाजपचे राज्यात सरकार स्थापन होण्याचे भाकीत केले जात आहे. आता नुकतेच केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी सुद्धा राज्य सरकार पडणार असून मार्चमध्ये भाजपचे सरकार स्थापन होणार असल्याचे भाकीत केले आहे. याबाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना विचारले असता 'काशीस जावे नित्य वदावे!' असे उत्तर देत त्यांनी राणे यांची बाजू मांडली. ते आज (ता.29 नोव्हेंवर) पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

Chandrakant Patil
धनंजय मुंडे, मला बोलायला लावू नका : पाटलांचा गर्भित इशारा

फडणवीस व पाटील यांच्या दिल्ली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे केंद्रीय नेतृत्व आणि पक्षश्रेष्ठी हे पाटीलांच्या कामकाजावर नाराज असून, भाजपात संघटनात्मक फेरबदल होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावर आज (ता.28 नोव्हेंबर) पाटील यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच, जे अशाप्रकारच्या चर्चा करतात "त्या सूत्रांची हिंमत असेल तर नाव सांगा, त्यांना हे माहिती नाही की, पाटील काय चीज आहे." असे देखील बोलून दाखवले.

Chandrakant Patil
मी पाटील; कुणाला घाबरणार नाही : चंद्रकांतदादा

'काशीस जावे नित्य वदावे!' याचा अर्थ माध्यम प्रतिनिधीने पाटलांना विचारला असता पाटील म्हणाले, देवाने बोलायला तोंड दिले आहे. त्यासाठी पैशे लागत नाहीत. मग त्यात काय चुकीचे? काय अडचण काय आहे. असे म्हणत, बोललेल्या वाक्याचा अर्थ म्हणजे, मला काशीस जायचे, मला काशीला जायचे असे सारखे म्हटलच पाहिजे. असे त्यांनी सांगितले. यानंतर काशीला कोण जाणार सत्ताधारी की विरोधक? असा प्रश्न विचारला असता पाटील यांनी मिश्किलपणे या प्रश्नाचे उत्तर हे कानात सांगतो असे म्हणत उत्तर देण्याचे टाळले.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षपूर्तीवर टीका करतांना ते म्हणाले की, राज्यातील सर्वच जनता सरकारवर नाराज असून हे सरकार फक्त वसूली करण्यावर लक्ष देणारे सरकार आहे, असा घणाघात पाटील यांनी केला. तसेच, आतापर्यंत सरकारच्या दोन मंत्र्यांना राजीनीमा द्यावा लागला असून वळसे पाटलांना बळच गृहमंत्री करण्यात आल्याचीही टीका पाटील यांनी केली.

Edited by - Vishnu Sanap

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com