Bhide Wada News : भिडे वाड्याच्या मूळ मालकांशी चंद्रकांत पाटलांनी केली चर्चा; लवकरच काम सुरु होणार

थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली.
Bhidewada
BhidewadaSarkarnama

Bhide Wada News : थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली. या वाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करण्यात यावे अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून स्थानिक नागरिक आणि काही संघटनांकडून करण्यात येत आहे. असे असतानात आज पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज मूळ जागा मालक असलेल्या पुना मर्चंट बॅंकेचे चेअरमन विजय ढेरे यांच्यासोबत चर्चा केली.

त्यांच्या या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होणे ही लोकभावना आहे आणि हे स्मारक होणारच, असा विश्वास यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. विजय ढेरे यांच्याशीही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारकासाठी सर्वतोपरी सहकार्य करु, अशी ग्वाही विजय ढेरे यांनी दिली.

Bhidewada
Pune News: '' मंगलदास बांदलांचा मी जिवलग मित्र होतो; मी त्यांना सरपंच केलं,पण त्यांनी मलाच फसवलं...''

चंद्राकांत पाटील हे देखील भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होण्यालाठी आग्रही आहेत. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाटली यांनी महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांची भेट घेत भिडे वाड्यासंदर्भातील शासनाच्या भूमिकेसंदर्भात सविस्तर चर्चाही केली होती. याशिवाय उच्च न्यायालयात यासंदर्भात शासनाची भूमिका त्यांनी प्रभावीपणे मांडावी, अशी विनंतीही पाटील यांनी महाधिवक्ता सराफ यांच्याकडे केली होती.

त्यानंतर त्यांनी भिडे वाडा संदर्भातील वाद लवकरात लवकर निकाली निघावा यासाठी विजय ढेरे यांच्याशीही सविस्तर चर्चा केली. भिडे वाड्याचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता तेथे याठिकाणी राष्ट्रीय स्मारक व्हावे हे महत्वाचे आहे. कारण हे स्मारक राज्यासाठीच नाही तर संपुर्ण देशातील महिलांसाठी प्रेरणास्थान असेल. असे आवाहन पाटलांनी केले होते. तर चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनाला ढेरेंनी सकारात्मक प्रतिसाद देत, बॅंकेच्या सर्व सभासद आणि भाडेकरूंसोबत चर्चा करून सहकार्याची भूमिका घेण्याबाबत आश्वासन दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in