सीबीएसई बारावी परीक्षा रद्द; मुख्यमंत्री ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचे आभार

राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षांबाबत काय निर्णय होणार याबाबत पालकांच्या मनात उत्सुकताआहे.
uddhav.jpg
uddhav.jpg

पुणे : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद दिले आहेत. ‘सीबीएसई’च्या निर्णयानंतर इंडियन स्कूल सर्टिफिकेट (आयएससी) बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, मूल्यांकन झाल्यानंतर अंतिम निकाल कधी जाहीर होणार याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही.(CBSE XII exam canceled; Chief Minister Thackeray thanks to Prime Minister Modi)

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून साधलेल्या संवादात कोरोना संसर्गाचे संकट लक्षात घेऊन बारावीच्या परीक्षांबाबत योग्य निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार निर्णय झाल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांचे अभार मानले आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द करण्याची मागणी पालकांकडूनही होत होती.


दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने याआधीच जाहीर केला आहे. परीक्षेऐवजी अंतर्गत मूल्यमापन करून निकाल जाहीर कण्यात येईल, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. मूल्यमापनाची पद्धती काय राहील त्याचा तपशीलदेखील राज्य सरकारने गेल्या आठवड्यात जाहीर केला आहे.राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. येत्या काही दिवसात त्यावर निर्णय अपेक्षित आहे. या साऱ्या पाश्‍र्वभूमीवर केंद्र सरकारने बारावीची सीबीएसईची परीक्षा रद्द करण्याचा व त्याऐवजी अंतर्गत मूल्यमापन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

बीसीएसई परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांचे अभार मानले आहेत. मात्र, राज्य सरकार राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षांबाबत काय निर्णय घेणार याबाबत पालकांच्या मनात उत्सुकता आणि चिंता आहे.केंद्र सरकारने सीबीएसई परीक्षांबाबत घेतलेला निर्णय सायंकाळी जाहीर झाला. त्यामुळे राज्य सरकारला त्याआधारे कोणताही निर्णय घेता आला नाही. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारकडून उद्या (ता.२) राज्य मंडळाची परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com