शिवसेना पुणे जिल्हा समन्वयकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. पक्षीय गटबाजीतून हे आरोप झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Shivsena
Shivsena Sarkarnama

इंदापूर (जि. पुणे) : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना (shivsena) राज्यात अडचणीत आलेली आहे. दुसरीकडे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवरही वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल होत आहेत. शिवसेनेचे पुणे (Pune) जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे आता अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यावर इंदापूर (Indapur) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यातील शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, जिल्हा समन्वयक बोंद्रे यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. पक्षीय गटबाजीतून हे आरोप झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Case of molestation registered against Shiv Sena Pune district coordinator)

Shivsena
नाराज चंद्रकांत हंडोरे हे एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार..? हंडोरे म्हणाले...

इंदापूर येथील शिवसेना जिल्हा समन्वयक विशाल शिवराम बोंद्रे (रा. इंदापूर) यांच्याविरोधात पक्षाच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यानेच विनयभंगाची तक्रार इंदापूर पोलिस ठाण्यात दिली होती. त्या तक्रारीनुसार बोंद्रे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित महिला आघाडीच्या पदाधिकारीने दिलेल्या तक्रारीनुसार ता. १४ जुलै रोजी इंदापूर येथील शिवसेना पक्ष कार्यालयात बैठक झाल्यानंतर फोटो काढण्यात आला. तो फोटो काढत असताना शिवसेना जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे यांनी पाठीमागे उभे राहून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करीत विनयभंग केला. याबाबतची तक्रार संबंधित महिलेने इंदापूर पोलिस ठाण्यात दाखल केली. त्यानुसार इंदापूर पोलिसांनी कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Shivsena
काँग्रेस आमदारांनीच क्रॉस व्होटिंग करत माझा पराभव घडविला : चंद्रकांत हंडोरेंनी मौन सोडले!

पक्षीय गटबाजीतून हे कृत्य : विशाल बोंद्रे

दरम्यान, शिवसेना जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. त्याच वेळी गेली पस्तीस वर्षे मी समाजकारण करीत आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजीतून हे कृत्य करण्यात आले आहे. याबाबत पक्षाच्या वरिष्ठांनी योग्य ती दखल घेणे आवश्यक आहे; अन्यथा यापुढे कोणावरही अशी स्थिती येऊ शकते आणि हे पक्षासाठी हे घातक आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in