Constable Exam: मोठी बातमी! CAPFच्या कॉन्स्टेबल भरतीच्या परीक्षा मातृभाषेतून देता येणार

कॉन्स्टेबल भरतीसाठी हिंदी-इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्येही पेपर तयार केले जातील.
CAPF constable recruitment
CAPF constable recruitmentSarkarnama

Constable Exam Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलासाठी (CAPF) हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये कॉन्स्टेबल (GJ) पदभरतीच्या परीक्षा आयोजित करण्यास मान्यता दिली आहे. CAPF मध्ये स्थानिक तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आला आहे. (CAPF constable recruitment exam can be given in mother tongue)

या निर्णयानुसार हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त आसामी, बंगाली, गुजराती, मराठी, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगू, ओडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी आणि कोंकणी या भाषांमध्ये प्रश्नपत्रिका काढण्यात येणार आहेत. याअंतर्गत लाखो उमेदवार त्यांच्या मातृभाषा आणि प्रादेशिक भाषेत परीक्षेला बसू शकतील, ज्यामुळे त्यांची निवड होण्याची शक्यता वाढेल.

CAPF constable recruitment
Nilesh Lanke's Warning : ‘मला मागचा नीलेश लंके व्हायला लावू नका’ : आमदार लंकेंनी कोणाला दिला इशारा...

कॉन्स्टेबल (GD) ही स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे घेतलेल्या प्रमुख परीक्षांपैकी एक आहे, ज्यामध्ये देशभरातून लाखो उमेदवार बसतात. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, ही परीक्षा 01 जानेवारी 2024 पासून 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जाईल.या निर्णयानंतर, राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारे स्थानिक तरुणांना त्यांच्या मातृभाषेत परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहित करतील अशी अपेक्षा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com