Cantonment Election : पुणे कँन्टोमेंट बोर्डासह देशभरातील ५७ बोर्डांच्या निवडणुका रद्द!

Pune Cantonment : संरक्षण मंत्रालयाच्या आदेशाने निवडणुका रद्द..
Pune Cantonment Election
Pune Cantonment ElectionSarkarnama

Cantonment Election : पुणे कँन्टोमेंट बोर्डासह देशभरातील ५७ बोर्डांच्या निवडणुका जााहीर झाल्या होत्या, संरक्षण मंत्रालयाने आज त्या रद्द केल्या आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या राजपत्रानुसार आजपासून १७ मार्च पासून निवडणुकविषयीचे सर्व कामकाज थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

याबाबत पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या कार्यालयात विशेष राजपत्रविषयीची सूचना लावण्यात आली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड कायदा २००६ च्या अधिनियम ४१ च्या आधारे ही ३० एप्रिल रोजी निवडणूक होणार होती. त्याबाबत १८ फेब्रुवारीला राजपत्राद्वारे सूचना देण्यात आली होती.

Pune Cantonment Election
Phaltan : उत्तर कोरेगावातील गावांना वसना योजनेतून पाणी मिळणार : रणजितसिंह निंबाळकर

देशातील ५७ कॅन्टोन्मेंट बोर्डात सध्या प्रशासक कार्यरत आहे. नोव्हेंबर २०२१ बोर्डाच्या सदस्यांचे सभासदत्व संपले असून बोर्डातील कारभार त्रिसदस्यीय समिती पाहत आहे. आतापर्यंत दोन वेळेस मुदतवाढ देण्यात आली होती. आता अचानक निवडणूक रद्द झाल्याने उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Pune Cantonment Election
Supreme Court hearing : सत्तासंघर्षावरील निर्णयासंदर्भात सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे विधान; युक्तीवाद लवकर पूर्ण करण्याची सूचना

केंद्रीय मंत्रालयाचे सहसचिव राकेश मित्तल यांनी यासंदर्भात अधिसूचना काढली होती. या अधिसुचनेनुसार देशभरातील ६२ पैकी ५७ कँटोन्मेंटच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यामध्ये छावण्यांमध्ये पुणे, खडकी, नगर, औरंगाबाद, नाशिकमधील देवळाली आणि नागपूरमधील कामठी या राज्यातील अशा एकूण सहा कँटोन्मेंट बोर्डांचीदेखील निवडणूका पार पडणार होत्या. मात्र आता या निवडणुका रद्द करण्यात आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in