
Kasba By Election : कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणात असलेल्या सर्व १६ उमेदवारांनी मिळून २४ फेब्रुवारीपर्यंत प्रचारावर अवघा २५ लाख ९७ हजार ४७२ रुपयांचा खर्च केला आहे. दरम्यान स्टार प्रचारकांचा खर्च पक्षाच्या खात्यात टाकल्याने उमेदवारांवरील खर्चाचा बोजा कमी झाल्याचे बोलले जात आहे.
या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी (प्ररिपा), राष्ट्रीय मराठा पार्टी (रामपा) आणि सैनिक समाज पार्टी (सैसपा) या पाच पक्षांचे अधिकृत उमेदवार आहेत. तर उर्वरित ११ अपक्ष उमेदवारही आपले नशिब आजमावत आहेत.
काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा प्रचारावर ११ लाख ६० हजार २९ रुपये तर, भाजपचे हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा ८ लाख ९४ हजार १७६ रुपयांचा खर्च झाला आहे. धंगेकर आणि रासने या दोन्ही उमेदवारांनी निवडणूक खर्चाच्या एकूण कमाल मर्यादेच्या प्रत्येकी केवळ चौथा हिस्साच खर्च केला असल्याचे दिसून आले आहे.
विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या खर्चाची कमाल मर्यादा प्रत्येकी ४० लाख रुपयांची आहे. उमेदवारी अर्ज दाखल झालेल्या दिवसापासून या खर्चाचा हिशोब केला जातो. यानुसार सर्व उमेदवारांनी प्रचारासाठी प्रत्येकी किती खर्च केला, याची तपासणी निवडणूक निरीक्षकांच्या सूचनेनुसार तीन टप्प्यात केली जाते.
ही तपासणी उमेदवार आणि निवडणुकीशी संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केली जाते, असे या मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी शनिवारी (ता. २५) सांगितले. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी झालेल्या उमेदवाराच्या खर्चाची आतापर्यंत तीनही टप्प्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे.
यामध्ये प्रत्येक उमेदवाराने टप्पानिहाय किती खर्च केला, हे पडताळले जाते. निवडणूक निरीक्षकांच्या सूचनेनुसार ही पडताळणी पूर्ण झाल्याची माहिती या मतदारसंघातील प्रचार खर्चाच्या हिशेबाची जबाबदारी असलेल्या नंदा हंडाळ यांनी सांगितले.
उमेदवारनिहाय खर्च (रुपयांत)
रवींद्र धंगेकर (काँग्रेस) - ११ लाख ६० हजार २९
हेमंत रासने (भाजप) - आठ लाख ९४ हजार १७६
आनंद दवे (अपक्ष) - एक लाख ४५ हजार ७१९
बलजितसिंग कोचर (प्ररिपा) - ७८ हजार
संतोष चौधरी (अपक्ष) - ७५ हजार ८८९
तुकाराम डफळ (सैसपा) - २९ हजार १७७
रवींद्र वेदपाठक (रामपा) - ४१ हजार २०
अजित इंगळे (अपक्ष) ५ हजार ३५३
अनिल हातागळे (अपक्ष) - २६ हजार ३०९
अलंकृता अभिजित आवाडे-बिचुकले (अपक्ष) - ५ हजार ३००
अमोल तुजारे (अपक्ष) - ११ हजार ३३३
खिसाल जाफरी (अपक्ष) - ३७ हजार ५००
चंद्रकांत मोटे (अपक्ष) - ५ हजार ६५६
रियाज सय्यद (अपक्ष) - २८ हजार
सुरेशकुमार ओसवाल (अपक्ष) ३० हजार २७०
हुसेन शेख (अपक्ष) - २३ हजार ८०१
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.