CAG : भाजपाच्या कारभाराची ‘कॅग’मार्फत चौकशीसाठी शिवसेनेचे पुण्यात आंदोलन

पाच वर्षाच्या काळात भाजपाने (BJP) मोठा भ्रष्टाचार केल्याचा शिवसेनेचा (Shivsena) आरोप आहे
Sivsena Pune
Sivsena PuneSarkarnama

पुणे : भारतीय जनता पार्टीची (Bhartiya Janata Party) सत्ता असलेल्या पुणे महापालिकेच्या गेल्या पाच वर्षातील कामाची ‘कॅग’मार्फत (CAG) चौकशी करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने आज पुणे महापालिकेच्या आवारात आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला पुण्यातील सेनेचे सर्व पदाधिकारी व आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.

Sivsena Pune
‘शरद पवारांनी खूप वेळा महाराष्ट्र पिंजून काढला; पण...’

गेल्या पाच वर्षात पुणे महाापलिकेत विकास कामांच्या अनेक योजना आल्या. मात्र, त्यावर कोट्यवधी रूपयांचा खर्च झाला. प्रत्यक्षात कामे झालीच नाहीत. या कामांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप शहराध्यक्ष संजय मोरे यांनी केला. स्मार्ट सिटी, जायकाचा नदी सुधार प्रकल्पासारख्या योजना योग्यरित्या मार्गी लागू शकल्या नाहीत, असा शिवसेनेचा आरोप आहे.

Sivsena Pune
गुलाम नबी आझादांचा काँग्रेसला मोठा धक्का; तब्बल ६४ नेत्यांचा पक्षाला रामराम

महापालिकेसमोर करण्यात आलेल्या या आंदोलनात महिला आघाडीच्या सहकाऱ्यांची संख्यादेखील मोठी होती. पुण्यात शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तणाव आहे. छोट्या-मोठ्या गोष्टींवरून तणावात भर पडत आहे. त्यामुळे आजच्या आंदोलनाला शिवसेनेच्या शहर पातळीवरील सर्व प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवक तसेच शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर विद्यमान मंत्री तानाजी सावंत यांच्या पुण्यातल्या कात्रज येथील कार्यालयावर हल्ला झाला. गेल्या महिन्यात याच ठिकाणी शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांची सभा झाली. या सभेनंतर विद्यमान मंत्री उदय सामंत यांच्या मोटारीवर हल्ला करण्यात आला.एकुणच शिवसेनेच्या दोन गटातील तणाव वाढत असल्याने आजच्या आंदोलनाला मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in