
पुणे : आई आजारी असल्याचे कारण सांगत राज्यातील चार महिला आमदारांकडून (Women MLA) ‘ऑनलाइन’ पैसे मागून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी औरंगाबाद येथून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांनी आज ताब्यात घेतले. यामध्ये एका मुलीचा समावेश आहे.कोणतीही गुन्हेगारी पाश्र्वभूमी नसलेल्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या या विद्यार्थ्यांकडून अर्थिक विवंचेनतून हा प्रकार झाल्याचे स्पष्ट होत आहे.
पुण्याच्या पर्वती मतदारसंघातील आमदार आमदार माधुरी मिसाळ यांना आई आजारी असल्याचे कारण सांगत चार हजार रूपयांची मदत करण्याची विनंती करण्यारा फोन गेल्या आठवड्यात एका व्यक्तीकडून आला होता. त्यानुसार आमदार मिसाळ यांनी चार हजार रूपये संबंधित व्यक्तीने दिलेल्या फोन क्रमांकावर ‘गुगल पे’च्या माध्यमातून पाठविले. त्यानंतर असाच प्रकार आमदार देवयानी फरांदे, श्वेता महाले व मेघना बोर्डीकर या भाजपाच्या इतर आमदारांसोबत झाल्याचे लक्षात आल्याने आमदार मिसाळ यांनी संबंधित व्यक्तीच्या विरोधात तक्रारी दिली होती.
या प्रकरणी पुणे पोलिसांनी आज औरंगाबादमधून दोघांना आज ताब्यात घेतले.मुकेश राठोड व सुनिता क्षीरसागर अशी या दोघांची नावे आहेत. राठोड हा बुलढ्याण्याचा रहिवासी आहे. राठोड व क्षीरसागर दोघे औरंगाबाद येथे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात, असे पोलिसंच्या तपासात पुढे आले आहे. दोघेही शेतकरी कुटुंबातील आहेत. पैशाची गरज होती म्हणून आईच्या आजारपणाचे कारण देत या दोघांनी आमदारांकडे फोन करून ‘गुगल पे’च्या माध्यमातून पैसे घेऊन फसवणूक केली आहे.
आमदार माधुरी मिसाळ यांनी पुण्यात तक्रार दिली होती. त्या आधारे पोलिसांनी या दोघांचा शोध घेतला. यातील मुकेश राठोड हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा विद्यार्थी मोर्चा बुलढाण्याचा आहे तर त्याची सहकारी सुनिता क्षीरसागर ही औरंगाबादची असल्याचे तपासात पुढे आले आहे. कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना केवळ आर्थिक अडचण असल्याने या दोघांकडून आमदारांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.