महाआघाडी आणि अमोल कोल्हेंमुळे बैलगाडा शर्यती सुरू झाल्या : सुप्रिया सुळे

बैलगाडा शर्यती सुरू झाल्या असून त्याचे श्रेय महाराष्ट्र विकास आघाडी आणि खासकरून खासदार कोल्हे यांचे आहे.
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama

खेड-शिवापूर (जि. पुणे) : "बैलगाडा शर्यती (Bullock cart race) सध्या सुरू झाल्या असून आज आपण सर्व बैलगाडा शर्यतींचा आनंद घेत आहोत. त्याचे श्रेय महाविकास आघाडी (Mahavikas aghadi) आणि खासकरून खासदार अमोल कोल्हे (dr Amol Kolhe) यांचे आहे," असे मत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी व्यक्त केले. (Bullock cart races started due to Maha aghadi and Amol Kolhe: Supriya Sule)

हवेली तालुक्यातील कोंढणपूर येथे खडकवासला विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उपमुख्यमंत्री केसरी बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री केसरी बैलगाडा शर्यतीत २०० बैलगाडे सहभागी झाले होते. बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या बैलगाडा शर्यतीस सुळे यांनी भेट दिली, यावेळी त्या बोलत होत्या.

Supriya Sule
ही दोस्ती तुटायची नाय...कट्टर विरोधक माने-जाधव १६ वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर!

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी राज्यातून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने प्रयत्न केले. दिल्लीत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्याबाबत पाठपुरावा केला. त्यामुळे बैलगाडा शर्यती सुरू झाल्या असून त्याचे श्रेय महाराष्ट्र विकास आघाडी आणि खासकरून खासदार कोल्हे यांचे आहे. बैलगाडा शर्यती पाहण्याचा आनंद घेतानाच आपण शिस्त आणि सुरक्षितता याचीही काळजी घेतली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

Supriya Sule
सध्या मी शिव्याही खूप खातोय; त्यामुळे माझं वजन वाढलं असावं : राज ठाकरेंची मिश्किली

या बैलगाडा शर्यतीत एकूण २०० बैलगाडे धावले. त्यात प्रथम क्रमांक- सरदार वादळ, दुसरा क्रमांक- बाबाराजे जगताप तेजा आणि शंकर 1130, तिसरा क्रमांक- भारत आणि सुंदर, चौथा क्रमांक-निशाणा तेजा वडकी, पाचवा क्रमांक-चंदर (शिंदेमाल) आणि सल्या सहावा क्रमांक-अशोक जोशी बलमा आणि अशोक योगी बलमा यांनी पटकावला.

Supriya Sule
'देशात दोनच हिंदुहृदयसम्राट; एक बाळासाहेब ठाकरे अन्‌ दुसरे नरेंद्र मोदी!'

खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे, जिल्हा परिषद सदस्या पूजा पारगे, माजी सभापती शुक्राचार्य वांजळे, संदीप मुजुमले, नगरसेवक सचिन दोडके, काका चव्हाण, अशोक गोगावले, सायली वांजळे, जितेंद्र कोंडे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in