राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही म्हणणारे, ब्रिजभूषण सिंह पुण्यात येणार : मनसेकडून मात्र विरोध नाही!

Brijbhushan Singh : भाजप बरोबर युतीची शक्यता यामुळे मनसेने आक्रमक भूमिका गुंडाळली का?
Brijbhushan Singh
Brijbhushan SinghSarkarnam

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मागील कालावधीत अयोध्या दौरा जाहीर होता. मात्र या दौऱ्याला उत्तरप्रदेशमधील गोंडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार ब्रिजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी जोरदार विरोध केला होता. यानंतर प्रकृती अस्वस्थाचे कारण देत, राज ठाकरेंनी अयोध्या दौरा स्थगित केला. सिंह हे महाराष्ट्रात येतील तेव्हा बघून घेऊ, असे मनसेकडून आव्हान देण्यात आले होते. मात्र आता सिंह यांचा लवकरच पुणे दौरा होत आहे, मात्र मनसेकडून याला अजूनही विरोध होताना दिसत नाही.

जो पर्यंत उत्तर भारतीयांची माफी मागणार नाही, तो पर्यंत उत्तर प्रदेशच्या भूमीवर पाय ठेवू देणार नाही, अशी आक्रमक आणि राज ठाकरेंना आव्हान देणारी भूमिका खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी घेतली होती. आता सिंह हे पुणे दौऱ्यावर येत आहेत, तर मनसे कडून त्यांना सद्यातरी विरोध न करण्याची भूमिका घेण्यात आली आहे.

पुण्यात २० ते २५ डिसेंबर या कालाधीत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्प प्रतिष्ठाण याचे आयोजन करणार आहे. सिंह हे मागील दहावर्षांपासून राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. यामुळे ते या कुस्ती कार्यक्रमासाठी पुण्यात येत आहेत.

Brijbhushan Singh
Sanjay Raut : माझ्या अटकेचे आदेश दिल्लीतून ; राऊतांचा अप्रत्यक्षपणे मोदी-शहांवर हल्ला!

आता सिंह यांच्या दौऱ्याला मनसेकडून विरोध होईल असे बोलले जात असतानाच, सध्यातरी सिंह यांच्या दौऱ्याला विरोध केला जाणार नाही, असे समजते. मनसेने विरोध न करण्याची भूमिका का घेतली? अशी चर्चा होत आहे. राज ठाकरेंचे भाजप नेत्यांशी सातत्याने होणाऱ्या भेटी, भाजप बरोबर वाढलेली जवळीक, भविष्यात भाजप बरोबर युतीची शक्यता आणि भाजपची नाराजी न ओढवून घेण्याचा मुद्दा, यामुळे मनसेने आपली आक्रमक भूमिका गुंडाळून ठेवली का ? अशा चर्चांना उधाण येत आहे.

Brijbhushan Singh
Aurangabad News : ठाकरे सरकारच्या कामाबाबत न्यायालयानं शिंदे-फडणवीस सरकारला सुनावलं

मात्र राज ठाकरे यांच्याकडून याबाबत काही पुढील आदेश आल्यानंतरच भूमिका जाहीर करू, असे पुणे मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्याचे समजते. यामुळे पुढील काही दिवसात ब्रिजभूषण सिंह आणि मनसेत राजकीय कुस्तीचा सामना रंगणार का ? हे ही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com