Kasba By-Election : कसब्यातील दोन्ही उमेदवार कोट्यधीश; रासनेंची १७ कोटीची तर धंगेकरांची...

Pune BJP and Pune Congress : अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रात दिली माहिती
Hemant Rasane, Ravindra Dhangekar
Hemant Rasane, Ravindra DhangekarSarkarnama

Maharashtra Politics : कसबा पोटनिवडणुकीचं आता वातावरण तापलं आहे. भाजपचे हेमंत रासने (Hemant Rasane) आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आज मोठे शक्तीप्रदर्शन करीत अर्ज दाखल केले आहे. यावेळी त्यांनी आपल्या संपत्तीबाबत शपथपत्रंही सोबत जोडले होते.

त्यात त्यांच्या रोख रक्कम, स्थावर मालमत्तेसह कर्जाचाही तपसील दिला आहे. त्यानुसार भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांची एकूण १७ कोटींची तर काँग्रसचे रवींद्र धंगेकर यांची पत्नीसह १४ कोटी ८३ लाख ९७ हजार ९५७ रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्यावर ३५ लाख

२०२२-२३ चे उत्पन्न

हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांचे २०२२-२३ चे उत्पन्न पाच लाख ७५ हजार ४१० रुपये आहे. तर त्यांच्या पत्नीचे चार लाख ३० हजार ८३० रुपये, तर मुलाचे तीन लाख १७ हजार ४३० रुपये वार्षिक उत्पन्न आहे. रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचे तीन लाख ३६ हजार ९४० रुपये तर त्यांच्या पत्नीचे तीन लाख ९८ हजार ४०० रुपयांचे २०२२-२३ या आर्थिक वर्षातील उत्पन्न आहे.

जंगम मालमत्ता

हेमंत रासने (Hemant Rasane) यांची जंगममालमत्ता ही एक कोटी ८२ लाख ८१ हजार ३६२ तर पत्नीच्या नावे २७ लाख ५९ लाख ३५७ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. मुलीच्या नावे आठ हजार ४२३ तर मुलाच्या नावे दोन लाख ७७ हजार ५७८ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. रवींद्र धंगेकर यांच्या नावे ४७ लाख ६ हजार १२८ रुपयांची जंगममत्ता आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावे ६८ लाख ६७ हजार ३७६ रुपयांची जंगम मालमत्ता आहे.

स्थावर मालमत्ता

हेमंत यांनी स्वतः दोन कोटी ६७ लाख ५९ हजार ९२ हजारांची स्थावर मालमत्ता आहे. तर पत्नीच्या नावे एक कोटी ८१ लाख १४ हजार ४९५ रुपयांची आहे. मुलीच्या नावे ४३ लाख २५ हजारांची तर मुलाच्या नावे १ कोटी ३३ लाख ५९ हजार ५३३ रुपयांची स्थावर मत्ता आहे. तसेच त्यांनी काही जागेवर २ लाख ५६ हजारांचे बांधकाम केलं आहे.

रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांची ८२ लाख २७ हजार २१ रुपयांची स्वयंसंपादीत स्थावर मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नीने एक कोटी पाच लाख ९६ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता खरेदी केली. धंगेकर यांना १० कोटी ५३ लाख सहा हजार ३३५ रुपयांची वारसाहक्काने स्थावर मालमत्ता मिळालेली आहे.

उमेदवारांवर असलेले कर्ज

हेमंत रासने यांच्यावर तीन कोटी ५५ लाख ६३ हजार ४१४ रुपयांचे कर्ज तर पत्नीच्या नावे २४ लाख ९३ हजार २६३ रुपयांचे कर्ज आहे. रवींद्र धंगेकर यांच्यावर ३५ लाख ७३ हजार १९२ रुपयांचे, तर त्यांच्या पत्नीवर ३२ लाख ८ हजार ७७८ रुपयांचे कर्ज आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com