संतोष जगताप खून प्रकरणी अटक केलेले दोघेही सराईत निघाले गुन्हेगार

अटक केलेले दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. आर्थिक कारणामुळे खुन (Murder) झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना (Pune police) मिळाली आहे.
संतोष जगताप खून प्रकरणी अटक केलेले दोघेही सराईत निघाले गुन्हेगार
Santosh JagtapSarkarnama

पुणे : उरुळी कांचन येथील संतोष जगताप खून प्रकरणात (Uruli Kanchan murder case) गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेले दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. आर्थिक कारणामुळे खुन झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. मात्र, या खुनामागे आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्‍यता पोलिसांनी (Pune Police) व्यक्त केली आहे. तसेच, या गुन्ह्याचा "मास्टरमाईंड' (Mastermind) कोण आहे, याचाही सखोल तपास केला जात असल्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (Police Commissioner Amitabh Gupta) यांनी स्पष्ट केले.

Santosh Jagtap
गोळीबार करून संतोष जगतापचा खून करणाऱ्या दोघांना ३० तासांत पकडले

पवन गोरख मिसाळ (वय 29), महादेव बाळासाहेब आदलिंगे (वय 26, दोघेही रा. दत्तवाडी, उरूळी कांचन) अशी अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. पोलिस आयुक्त गुप्ता यांनी पत्रकार परिषदेमध्ये याबाबत माहिती दिली आहे. यावेळी अतिरीक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे उपस्थित होते.

स्वागत खैरे व त्याच्या साथीदारांनी संतोष जगतापवर गोळ्या घालून त्याचा खुन केला. तर खैरे हा जगतापच्या अंगरक्षकाने केलेल्या गोळीबारात ठार झाला. दोघांविरुद्धही लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना इंदापुर येथून अटक केली. खैरे हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्याविरुद्ध खून, खुनाच्या प्रयत्नासह गंभीर गुन्हे दाखल होते. तर, अटक केलेल्या मिसाळविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगणे व अन्य गंभीर गुन्हे आहेत. आदलिंगे हा देखील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्धही गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Santosh Jagtap
जामिनावर बाहेर आलेल्या खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा चार जणांनी केला खुन...

आरोपींची चौकशी सुरू असून त्यांच्याकडून बरीच माहिती मिळेल, असे आयुक्त गुप्ता यांनी स्पष्ट केले. संतोष जगताप याची स्वतःची टोळी होती. 2011 मध्ये वाळु उपशाच्या कारणावरुन दौंड येथील सख्ख्या चुलत भावांचा खुन झाला होता. त्यामधील आरोपींमध्ये जगताप याच्यासह 35 जणांचा समावेश होता. तसेच, 2016 मधील खुनाच्या घटनेतही त्याचा सहभाग होता. त्यामुळे त्याच्या खुनाच्या घटनेला वेगवेगळी कारणे असल्याचे पोकळे यांनी सांगितले.

" गोळीबार करून केलेल्या खुनाच्या घटनेतील आरोपींचा तत्काळ शोध घेऊन त्यांना अटक केली. या घटनेमागे वेगवेगळी कारणे असली तरीही त्यामागे आर्थिक कारण असू शकते. या गुन्ह्यात अन्य व्यक्तींचाही सहभाग असू शकतो, तसेच, हा गुन्हा कोणी करण्यास सांगितले आहे का ? याचाही पोलिस तपास करीत आहे.'' असे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in