पिंपरीत दोन्ही शिवसेना एकमेकांसमोर उभ्या; कुणाची ताकद किती?, कोण मारणार बाजी?

PCMC : स्थानिक नेते हे आतापासूनच नागरी प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी एकत्रित फिरू लागले आहेत.
Uddhav Thackeray, Sharad Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Sharad Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shindesarkarnama

पिंपरी : आठ महिन्यांपूर्वी मुदत संपलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक या वर्षअखेरीस वा नवीन वर्षाच्या प्रारंभी होऊ शकते. त्यामुळे पालिकेतील मावळते सत्ताधारी भाजपने बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या मदतीने या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यांची युती झाल्यात जमा असल्याने दोन्ही पक्षांचे नेते नागरी प्रश्नी एकत्रित फिरू लागले आहेत.

दुसरीकडे राष्ट्रवादीशी आघाडीबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेशी अद्याप चर्चा होणे बाकी आहे. (Uddhav Thackeray, Sharad Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde Latest News)

Uddhav Thackeray, Sharad Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
दिवाळीनंतर राज्यात प्रशासकीय फेरबदल ; शिंदे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय...

दरम्यान, शिवसेनेतील दुफळीनंतर पिंपरी-चिंचवडचे खासदार श्रीरंग बारणे आणि माजी खासदार तथा उपनेते शिवाजीराव आढळराव-पाटील हे शिंदे गटात गेल्याने बाळासाहेबांच्या शिवसेना पिंपरी-चिंचवडमध्ये मजबूत झाल्यासारखी दिसते आहे. हा शिंदे गट आणि भाजप एकत्रित पालिका निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण त्यांचे स्थानिक नेते हे आतापासूनच नागरी प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी एकत्रित फिरू लागले आहेत. त्याबाबत पालिका प्रशासनाकडे ते एकत्र जाऊन आले. नुकताच पाणीप्रश्नी त्यांनी संयुक्त पाहणी दौरा केला. फक्त थोडी अडचण जागावाटपात या दोघांना येणार आहे. कारण भाजपकडे सर्वच जागांवर उमेदवार आहेत.

Uddhav Thackeray, Sharad Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
राजेंद्र मुळक यांनीच केदारांच्या विरोधात बंडखोरी करायला लावली; कंभालेंनी फोडला बॉम्ब...

गतवेळीही त्यांनी सर्वच्या सर्व १२८ जागा लढवून ७७ जिंकल्या होत्या. यावेळी, मात्र त्यांना काही जागा बाळासाहेबांच्या शिवसेनेला सोडाव्या लागणार आहेत. ते पिंपरी पालिकेत कसे खाते उघडतात याविषयी उत्सुकता राहणार आहे. तर, भाजपने अगोदरच शंभर प्लसचा नारा दिलेला आहे. जागांची ही अडचण राष्ट्रवादीलाही भेडसाणार आहे. त्यांचीही उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि कॉंग्रेस अशा दोन पक्षांशी आघा़डी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २००७ व २०१२ ला स्वबळावर पालिकेत सत्तेत आलेल्या राष्ट्रवादीकडेही सर्व जागांवर उमेदवार आहेत.

मात्र, आघा़डी झाली, तर त्यांना दोन पक्षांना जागा द्याव्या लागणार आहेत. गतवेळी शिवसेनेचे (त्यावेळी एकच होती) पिंपरी पालिकेत नऊ नगरसेवक होते. त्यातील एक भाजपमध्ये गेले आहेत. तर, बाकीचे दोन गटात विभागलेले आहेत. त्यामुळे आठपैकी किती पुन्हा निवडून येणार हा प्रश्न आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीनेही शंभरप्लसही हाळी दिली आहे.

Uddhav Thackeray, Sharad Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
त्यानंतर मी रामदास कदमांवर बोलायचे सोडून दिले आहे : आदित्य ठाकरेंचा हल्लोबाल

दरम्यान, युती जवळपास पक्की झाल्याचे समजून (BJP) भाजप-शिंदे गटाने आगामी पालिका निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यांचे नेते एकत्र दिसत आहेत. याउलट स्थिती राष्ट्रवादीत आहे. त्यांची ठाकरे शिवसेनेशी (Shivsena) आघाडीबाबत चर्चा होणेच बाकी आहे. त्याबाबतचे अधिकार अजित पवार यांनी स्थानिक नेत्यांना दिले आहेत. ते पुढील आठवड्यात ठाकरे सेनेचे संपर्कनेते अहिर यांच्याशी ती करण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसच्या शहर अध्य़क्षांशीही ते बोलणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in