बाळासाहेब ठाकरे आणि मंचर गावाचा ऋणानुबंध उलगडला उद्धव ठाकरेंसमोर

मंचर नगरीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल, असा हा दिवस आहे, अशी भावना व्यक्त झाली.
uddhav thackrey and Manchar
uddhav thackrey and Manchar

पुणे : आंबेगाव तालुक्‍यातील मंचर (जि. पुणे) येथील छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार नूतनीकरण कामाचे व कार्डियाक अँब्युलन्सचे ऑनलाईन उद्घाटन  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍या आज झाले. मंचर हे शहर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ऋणानुबंध या निमित्ताने उलगडला.

कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्‍हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्‍यासह इतर नागरिक ऑनलाईन उपस्थित होते.

आढळराव पाटील यांनी मनोगतात मंचरमधील या घटनांना उजाळा दिला. ते म्‍हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते १९७८ साली मंचर येथे (ता. आंबेगाव, जि.पुणे) छत्रपती शिवाजी महाराज वेशीचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला होता. त्‍यानंतर तब्बल ४२ वर्षांनी या वेशीचे भव्यदिव्य महाद्वारामध्ये रूपांतर करण्यात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासह नूतनीकरण करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत निधीतून ग्रामपंचायतीने सुमारे २८ लक्ष रूपयांची कार्डियाक अँब्युलन्स खरेदी केलेली आहे. या अँब्युलन्समध्ये व्हेंटीलेटर, डिफायब्रीलेटर, ऑक्सीजन मशीन, मॉनिटर्स आदि कोरोनाविरोधात लढण्यासाठी सुसज्ज मशीन्‍स बसविण्यात आल्या आहेत.

अन्‍यायाविरुध्‍द लढण्‍याचे तेज ज्‍या मातीत रुजले आहे त्‍या मातीचा आशिर्वाद आपल्‍या पाठीशी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या वास्‍तव्‍याने पावन झालेली नगरी आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी ठरलेली आहे. भक्ती आणि शक्तीचा संगम या भूमीत आपल्याला बघायला मिळतो. या पट्टयात अनेक महान संत, क्रांतीकारक होवून गेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला अन्यायाविरुध्द लढण्याची शिकवण दिली आहे. त्यांच्याकडून आपण लढण्याचा व जिंकण्याचा गुण आत्‍मसात केला पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग केला पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. ठाकरे यांनी स्व. किसनराव बाणखेले यांचे स्मरण  केले, तसेच जुन्‍या आठवणींना उजाळा देवून कार्यक्रमाची सुरुवात केली.

दिलीप वळसे-पाटील म्हणाले, मंचर नगरीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल, असा हा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारुढ पुतळा मंचरच्‍या वैभवात भर घालणारा असून तो सर्वांनाच प्रेरणा देत राहील. कोरोना विषाणूच्या संकटकाळात मोहरम व गणेशोत्सव सण साजरे करतांना नागरिकांनी कुठेही गर्दी करु नये, सामाजिक अंतर राखावे, वारंवार हात धुवावे, घराबाहेर पडतांना मास्कचा न चुकता वापर करावा, स्वयंशिस्त पाळावी. या काळात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासन उत्तम काम करीत असून नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले. ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्‍या कार्डियाक अँब्युलन्सचा उपयोग तालुक्‍यातील नागरिकांना होईल, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे यांनी केले. आभार वसंतराव बाणखेले यांनी मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com