भाजपच्या 'मिशन बारामती'ला सुरुंग; 'रासप'ने केली मोठी घोषणा...

RSP : कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे बारामती लोकसभेसाठी महादेव जानकर हेच राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार असतील...
Rsp Leader Mahadev Jankar Latest News
Rsp Leader Mahadev Jankar Latest News Sarkarnama

इंदापूर : आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बी फॉर बारामती मिशन हाती घेत बारामतीतून विजय मिळवण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असतानाच भाजपचा पूर्वाश्रमीचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने मात्र भाजपच्या मोर्चेबांधणीला सुरुंग लावल्याचे दिसत आहे.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते (Kashinath Shevte) यांनी बारामती लोकसभा महादेव जानकर (Mahadev Jankar) लढविणार, अशी घोषणा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आता यावर भाजप (BJP)काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. (Rsp Leader Mahadev Jankar Latest News )

Rsp Leader Mahadev Jankar Latest News
भुजबळ जातांना एकटे गेले पण येतांना पूर्ण राष्ट्रवादी अन् कॅाग्रेसलाही घेऊन आले...

आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीतून विजय मिळवण्यासाठी भाजपने नियोजन सुरू केले आहे. त्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बारामती लोकसभा मतरसंघाचा दौरा केला होता. तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही बारामतीत येत वातावरण निर्मिती केली होती. त्याच वेळी दुसरीकडे मागील निवडणुकीत भाजपचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षनेही बारामती लोकसभा मतदार उमेदवार देणार असल्याचे जाहीर केल्याने निवडणुकीपूर्वीच भाजपच्या अडचणी वाढणार आहेत.

याबाबत रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी भाजपच्या मिशन बारामतीला सुरुंग लावणारं विधान केलं आहे. बारामती लोकसभा जिंकायची ताकद फक्त आणि फक्त महादेव जानकर यांच्यामध्येच आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे बारामती लोकसभेसाठी महादेव जानकर हेच राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार असतील, अशी घोषणा केली. यामुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Rsp Leader Mahadev Jankar Latest News
झारखंड मुक्ती मोर्चाने धनुष्यबाण चिन्हावर महाराष्ट्रात निवडणूक लढवली तर चालेल का?

रासपचे नेते महादेव जानकर यांच्या उपस्थितीत काल इंदापूर तालुक्यातील रुई गावी शेतकरी मेळावा झाला. यावेळी बोलताना शेवते यांनी हे विधान केलं. राष्ट्रीय समाज पक्ष हा पूर्वाश्रमीचा भाजप युतीचा घटक पक्ष आहे हे विशेष.

चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर मिशन बारामती आखण्यात आलं. त्यानुसार बावनकुळे यांनी बारामतीत येऊन मोर्चेबांधणी केली होती. बारामती जिंकण्यासाठी त्यांनी बारामतीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा पहिला दौरा ही झाला आहे. तसेच कोणतीही जागा कुणाची मक्तेदारी नसते, ती मक्तेदारी मोडता येते, असे विधान करत बारामती जिंकणारच असा निर्धार बावनकुळेंनी बोलून दाखवला होता. जानकर हे 2014 मध्ये बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढले होते. त्यावेळी जानकरांचा 69 हजार मतांनी पराभव झाला होता. मात्र जानकरांना मिळालेली मते दुर्लक्षून चालणार नाहीत. आता जानकर यांच्या पक्षाने या जागेवर दावा केल्याने भाजपची अडचण झाली आहे.

Rsp Leader Mahadev Jankar Latest News
मोठी बातमी! ऋतुजा लटके यांना दिलासा...

दरम्यान, मी संपूर्ण राज्यात तयारी करीत असून मी बारामतीतून निवडणूक लढणार,असे मी म्हटलेलं नाही. अजून याबाबत काहीच ठरलेलं नसल्याचे, महादेव जानकर यांनी 'सरकारनामा'शी बोलतांना स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com