Kasba By Election : 'कसबा' बिनविरोध करण्यासाठी भाजपच्या जोरदार हालचाली; आमदार मिसाळांकडे दिली मोठी जबाबदारी

Bjp News: लोकप्रतिनिधीच्या निधनासारख्या दुःखद घटनेनंतर सर्वसंमतीने पोटनिवडणूक बिनविरोध होते...
Madhuri Misal, Bjp
Madhuri Misal, Bjp Sarkarnama

Pune Bjp On Kasba By Election : भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळकांच्या निधनानंतर कसबा पेठ मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक लढविण्याची तयारी महाविकास आघाडीनं दर्शविली आहे. याचवेळी पुन्हा एकदा भाजपकडून ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडून हालचाली सुरु केल्या आहेत. आता पुणे शहर भाजपकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करावी यासाठी भाजप सर्वपक्षांना आवाहन करणार आहे. भाजप (BJP)कडून याची जबाबदारी ही पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मिसाळ या आता सर्वपक्षांच्या प्रमुख नेत्यांना ही पत्राद्वारे कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती करणार आहे.

Madhuri Misal, Bjp
Jalgaon Braking : महापालिका आयुक्तपदी डॉ. विद्या गायकवाड कायम : ‘मॅट’च्या निर्णयाने सरकारला चपराक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ,शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि पुण्यातील सर्वपक्षांच्या शहर अध्यक्षांना पत्र लिहून पुणे शहर भाजपच्या वतीने कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन करण्यात आलं आहे.

पत्रात काय म्हटलंय?

देशाच्या राजकारणात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं अनन्यसाधारण स्थान आहे. विकासकामात राजकारण केले जात नाही. सर्व पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते एकमेकांशी उत्तम प्रकारचे संबंध प्रस्थापित करतात. तसेच लोकप्रतिनिधीच्या निधनासारख्या दुःखद घटनेनंतर सर्वसंमतीने पोटनिवडणूक बिनविरोध होते.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मुक्ता टिळक यांच्या दुःखद निधनामुळे पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. आता ही परंपरा कायम राखत कसबा मतदार संघाची निवडणूक बिनविरोध करावी अशी विनंती करणारे पत्र लिहिले आहे. बिनविरोध निवडणूक करणे हीच मुक्ता टिळकांना (Mukta Tilak) खरी श्रद्धांजली ठरेल असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

Madhuri Misal, Bjp
30-30 Scam News : राठोडला मोबाईलवरून नातेवाईकाशी बोलणे महागात पडले, चौकशी सुरू...

महाविकास आघाडीत कसबा निवडणुकीवरुन वादाची ठिणगी?

भाजपच्या आवाहनाला आता महाविकास आघाडीकडून कसा प्रतिसाद दिला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. तसेच उमेदवारांची नावे देखील समोर आली होती. उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेऊन लवकरच उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती देखील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली आहे.

याचवेळी शिवसेना( ठाकरे गट) शहरप्रमुख संजय मोरे हेही कसबा पोटनिवडणूकीत ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून उतरणार असल्याचे बॅनर झळकले होते. यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com