ओबीसी आरक्षणासाठी भाजपाचे २६ जूनला राज्यभर चक्का जाम

ओबीसींच्या आरक्षणाप्रश्‍नी राज्य सरकार पूर्णपणे जबाबदार
pankaja.jpg
pankaja.jpg

पुणे : ओबीसी आरक्षणाच्या विषयात वेळकाढूपणा करणाऱ्या राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी तसेच ओबीसींच्या आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्राभर २६ जूनला भारतीय जनता पार्टीच्यावतीने चक्का जाम आंदोलन करण्याची घोषणा भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आज पुण्यात केली.(BJP's statewide jam on June 26 for OBC reservation)

ओबीसींच्या आरक्षणाप्रश्‍नी राज्य सरकार पूर्णपणे जबाबदार असून या विषयात राज्य सरकार केंद्र सरकारला ओढून राज्य सरकार केवळ राजकारण करीत आहे., असा आरोप मुंडे यांनी केला. जनगणनेच्या नावाखाली केंद्राला जबाबदार धरून राज्य सरकार केवळ दिशाभूल करीत आहे, असे त्या म्हणाल्या. भाजपा कार्यकर्त्यांची एक बैठक आज पुण्यात झाली. त्यानंतर ओबीसी समाजाचीही बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत मुंडे बोलत होत्या. मुंडे म्हणाल्या, ‘‘ मुळात राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींना आरक्षण गमवावे लागले आहे.राज्य सरकार न्यायालयात पुरेशी बाजू मांडण्यात कमी पडले. त्याचा परिणाम म्हणून आरक्षण रद्द झाले. राज्य सरकार ओबीसींच्या विषयात उदासीन असल्याने न्यायालयात त्यांना पूर्ण तयारीनीशी बाजू मांडावी, असे वाटले नाही. आरक्षण रद्द होण्यास केवळ राज्य सरकार जबाबदार असून त्यांच्या अपयशाला ते इतरांना जबाबदार धरत आहे. या विषयात केवळ वेळकाढूपणा काढणाऱ्या सरकारला जाब विचारण्यासाठी तसेच ओबीसींना आरक्षण मिळावे म्हणून संपूर्ण महाराष्ट्राभर येत्या २६ तारखेला भाजपाच्यावतीने चक्का जाम आंदोलन करणार आहे.’’

राज्याची विधानसभा व मंत्रीमंडळ ओबीसींच्या आरक्षणाचा हा प्रश्न सोडवू शकतात. मात्र, कोणताही प्रश्‍न सोडविण्याची त्यांची मानसिकता नाही.
ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक होऊ देणार नाही, असे मुंडे यांनी सांगितले. आरक्षणाच्या विषयात केंद्र सरकारला जबाबदार धरून त्यांना या विषयात ओढणे हा राज्य सरकारचा आडमुठेपणा आहे. आपल्या हातात असताना कोणताही प्रश्‍न सोडवायचा नाही उलट इतरांना जबाबदार धरून आपण जबाबदारीतून मुक्त व्हायचे ही राज्य सरकारची भूमिका आहे, अशी टीका मुंडे यांनी केली.

Edited By : Umesh Ghongade
--------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com