NCP News : राष्ट्रवादीच्या नाराज पदाधिकाऱ्याकडून भाजपच्या बड्या नेत्याला पायघड्या

मी किती आणि कसा निर्णायक आहे, हे दाखवून देण्याची वेळ जवळ येत आहे.
Pradip Kand-Abaraje Mandhare
Pradip Kand-Abaraje MandhareSarkarnama

शिक्रापूर (जि. पुणे) : पुणे (Pune) जिल्हा परिषदेचे (ZP) अध्यक्षपद अथवा समितीचे सभापतिपद, तसेच शिरुर (Shirur) बाजार समितीच्या (Bazaar Samiti) सभापतिपदाचा शब्द मिळूनही पाच वर्षांत काहीच न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) जिल्हा परिषद सदस्या कुसुम आबाराजे मांढरे व त्यांचे पती शिरुर बाजार समितीचे संचालक आबाराजे मांढरे (Abaraje Mandhare) यांची नाराजी उघड होऊ लागली आहे. मांढरे परिवाराच्या एका कार्यक्रमात त्याचा प्रत्यय आला आणि भाजपकडून शिरुर-हवेलीचे संभाव्य उमेदवार समजले जाणारे प्रदीप कंद (Pradip Kand) हे या कार्यक्रमाला हजर होते, त्यांचा विशेष सन्मानही झाला. कार्यक्रम धार्मिक असला तरी मांढरे दांपत्याची नाराजी तेथेही लपून राहिली नाही, त्यामुळे राष्ट्रवादीसाठी हा सूचक इशारा मानला जात आहे. (BJP's Pradeep Kand was invited to the program by the Upset NCP leader)

शिक्रापुरातील कोयाळी पुनर्वसन जिल्हा परिषद शाळेच्या आठ वर्गखोल्याच्या उद्‌घाटन कार्यक्रमाला आमदार अशोक पवार व राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित असताना त्याकडे जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, शिरूर बाजार समितीचे संचालक आबाराजे मांढरे यांनी पाठ फिरवली. मांढरेंच्या अनुपस्थितीची एकच चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यावेळी त्यांनी योग्य वेळी बोलेन असे सांगून मौन पाळले होते.

Pradip Kand-Abaraje Mandhare
Solapur Municipal Election : सोलापुरात महाआघाडीचं ठरलं; पण जागा वाटपात शिवसेनेची कोंडी होणार : ४०: ४०: २० चा फॉर्म्युला

येथील स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्राचा वर्धापन दिन कार्यक्रम सलग तीन दिवस सुमारे आठ ते दहा हजार भाविकांच्या उपस्थितीत झाला. त्याचे संयोजन मांढरे यांनीच केले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचा एकही बडा पदाधिकारी आले नसताना शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीशी फारकत घेऊन जिल्हा बॅंकेत पोहचलेले विधानसभेचे संभाव्य उमेदवार प्रदीप कंद, भाजपचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, काका खळदकर यांनी आवर्जून उपस्थिती लावली. मांढरे पती-पत्नींनी त्यांचा यथोचित सन्मानही केला. यावेळी कंदांशी मांढरेंची झालेली कानातील कुजबुज या धार्मिक कार्यक्रमातही लक्षवेधी ठरली.

Pradip Kand-Abaraje Mandhare
Vijaykumar Deshmukh News : काडादींचा डाव उधळण्यासाठी देशमुखांची जोरदार फिल्डिंग : मोठे मासे लावले गळाला?

शिक्रापूरच्या राजकारणात माजी सभापती मंगलदास बांदल यांना थोपविण्यासाठी मांढरे यांना राष्ट्रवादीकडून बरीच रसद पुरविली गेली अन मांढरेंनीही आपले प्रस्थ या भागात तयार केले. मात्र, बांदलांवरील कारवाईनंतर मांढरेंना दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांच्या पत्नी कुसुम मांढरेंना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अथा एखाद्या समितीचे सभापतीपद मिळालेले नाही. आबाराजे मांढरे यांना शिरूर बाजार समितीचे सभापतीपदही देण्यात आले नाही. राष्ट्रवादीच्या नेत्याकडून जो शब्द देण्यात आला होता, तो पूर्ण न झाल्याने मांढरेंची नाराज उघड होऊ लागली आहे. त्यातून त्यांची राजकीय पावले भाजपच्या दिशेने पडू लागली आहेत, असे संकेत मिळत आहेत. मांढरे आणि बांदल हे दोन्ही गट राष्ट्रवादीच्या विरोधात राहिल्यास शिक्रापूर, सणसवाडी, तळेगाव ढमढेरे तसेच कोरेगाव भीमा या गावांतील राजकारणावर मोठा परिणाम होऊ शकतो.

Pradip Kand-Abaraje Mandhare
Rajan Patil News : राजन पाटलांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला? : पक्षांतराबाबत माजी आमदारांचाही गौप्यस्फोट

योग्य वेळ जवळ येत आहे : आबाराजे मांढरे

माझी राजकीय क्षमता मी सिद्ध करुन दाखवली आहे. कंद यांच्या सत्काराचे फार राजकीय अर्थ लावू नयेत. एवढे मात्र नक्की की, मी किती आणि कसा निर्णायक आहे, हे दाखवून देण्याची वेळ जवळ येत आहे.

बांदलांचा जामीन आणि मांढरेंची जुळवणूक

मंगलदास बांदल यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला असून ते पुढील १५ दिवसांत बाहेर येण्याची शक्यता आहे. याच काळात कधीकाळी बांदलांचे जिवलग मित्र राहिलेले आबाराजे मांढरे यांनी राष्ट्रवादीला सूचक इशारा देत भाजपच्या प्रदीप कंदांना कार्यक्रमासाठी पाचारण करणे, शिरूरच्या राजकारणातील मोठी घडामोड मानली जाते. कारण बांदल, कंद व मांढरे यांच्याशी घनिष्ठ असलेले शिरुर तालुक्यातील अनेक पदाधिकारी राष्ट्रवादीत सक्रीय आहेत. ते सर्व खांब ढिले करण्याचे काम या कंद-मांढरे भेटीने आगामी काळात झाले नाही तरच नवल म्हणावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com