अजितदादांच्या जिव्हारी लागणार पराभव : जिल्हा बॅंकेत भाजपचे प्रदीप कंद विजयी

भाजपचा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत अधिकृत शिरकाव
अजितदादांच्या जिव्हारी लागणार पराभव : जिल्हा बॅंकेत भाजपचे प्रदीप कंद विजयी

Pradip Kand Wins PDCC Bank election

Sarkarnama

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसला पुणे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. गद्दारांना पराभूत करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले होते. मात्र राष्ट्रवादी काॅंग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश घुले यांना पराभूत केले आहे. कंद यांना 405 तर घुले यांना 391 मते पडली. (Pradip Kand Wins PDCC Bank election)

या बॅंकेवर राष्ट्रवादीच वर्चस्व असले तरी कंद यांच्या रूपाने भाजपला एक अधिकृत जागा मिळाली आहे. दुसरीकडे तालुकास्तरीय अ वर्ग मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार पॅनेलचे उमेदवार आमदार अशोक पवार (शिरुर), सुनील चांदेरे (मुळशी) आणि अपक्ष विकास दांगट (हवेली) यांनी माजी मारली आहे.

Pradip Kand Wins PDCC Bank election

मोठी बातमी : पुणे शहरात पुन्हा निर्बंध लागू; ओमिक्राॅनचा धसका

बॅंकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे आणि प्रकाश म्हस्के यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. या तीनही मतदारसंघात मतदारांनी नवीन चेहऱ्यांना पसंती दिली आहे.

Pradip Kand Wins PDCC Bank election

पुणे जिल्हा बँक : हवेलीतील मैत्रीपूर्ण लढतीमध्ये म्हस्केंचा पराभव; विकास दांगटांची बाजी

हवेली तालुका अ वर्ग मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रकाश म्हस्के आणि राष्ट्रवादीचेच विकास दांगट यांच्यात मैत्रीपूर्ण लढत झाली. या लढतीत दांगट यांनी सुमारे १५ मतांनी विजय मिळवला आहे. म्हस्के यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. दांगट यांना ७३ तर, म्हस्के यांना ५८ मते मिळाली आहेत.

Pradip Kand Wins PDCC Bank election

पुणे जिल्हा बँक : मुळशीत कलाटेंना धक्का, राष्ट्रवादीच्या चांदेरेंचा गुलाल

शिरूरचे आमदार अशोक पवार हे ८६ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना १३२ पैकी १०९ मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार आबासाहेब गव्हाणे यांना २३ मते मिळाली आहेत.

मुळशी तालुका मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार पॅनेलचे उमेदवार सुनील चांदेरे विजयी झाले आहेत. त्यांनी बॅंकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे यांचा पराभव केला आहे. येथील एकूण ४५ मतांपैकी चांदेरे यांना २८ तर, कलाटे यांना १७ मते मिळाली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.