Chinchwad By Election : राहुल कलाटेंना भाजपचा छुपा पाठिंबा? महेश लांडगेंनी स्पष्टचं सांगितलं...

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीप्रमाणे चिंचवडमध्येही निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे.
Mahesh Landge
Mahesh Landge Sarkarnama

Chinchwad By Election कसबा विधानसभा पोटनिवडणुकीप्रमाणे चिंचवडमध्येही निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. चिंचवडमध्ये भाजपकडून अश्विनी जगताप निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर महाविकास आघाडीकडून विठ्ठल उर्फ नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.तर शिवसेनेचे राहुल कलाटे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या तिहेरी लढतीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अशात राहुल कलाटे यांना भाजपचा छुपा पाठिंबा असल्याची आणि कलाटेंच्या बंडखोरीचा भाजपला फायदा होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत भाजप आमदार महेश लांडगे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ''गेल्या दोन निवडणुकांमध्ये राहुल कलाटे हे शिवसेनेचे उमेदवार होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीकडे तिकीट मागितलं होतं. भाजपकडे नाही. पण त्यांच्यात काही अंतर्गत मतभेद असतील. पण भाजप आणि राहुल कलाटे यांचा दुरान्वये कोणताही संबंध नाही. मला किंवा आमच्या पक्षातील वरिष्ठांना त्यासंदर्भातील माहिती नाही. तो त्याच्यातील वाद आहे, तो कशामुळे झाला आणि का झाला हे आम्हाला माहिती नाही. ते अपक्ष का लढले हा त्यांचा प्रश्न आहे. असे स्पष्टीकरण भाजप आमदार महेश लांडगे यांनी दिले आहे.

Mahesh Landge
Patan : शिवजयंतीदिनी शंभूराज देसाई देणार युवकांना नोकरीची संधी; पाटणला महामेळावा

महाविकास आघाडीचे आम्हाला मुळात आव्हान वाटतचं नाही. याचं कारण म्हणजे लक्ष्मण जगताप यांचा या शहरावरच नव्हे तर संपुर्ण जिल्ह्यावर प्रभाव होता. या शहराच्या विकासात लक्ष्मण भाऊंचं फार मोठं योगदान आहे आणि हे योगदान या शहरातला नागरिक विसरू शकत नाही. लक्ष्मण भाऊंनी जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या पाहता पुढच्या ५० वर्षात शहराला कशाची गरज आहे. हे पाहून काम केलं आहे. चिंचवड मतदार संघातल्या कोणत्याही घरात जाऊन विचारलं तरी तो म्हणेल की ही निवडणूक व्हायचाल नव्हती पाहिजे असे म्हणेल, अशी भूमिका भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली आहे.

भाजप फक्त निवडणुकीच्या वेळी काम करते असं नाही तर भाजप आणि भाजपचे कार्यकर्ते ३६५ दिवस ग्राऊंडवर काम करत असतात. संघटनात्मक यंत्रणा फार मजबूत आहे. त्यामुळे कधीही निवडणूक लागली तरी आम्ही निवडणुकीला सामोरे जायला तयार असतोय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com