Hemant Rasane Reaction: कसबा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर हेमंत रासनेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Kasba By Election Result: मला विजयाची खात्री होती पण...
Hemant Rasane
Hemant Rasane Sarkarnama

Hemant Rasane First Reaction On Kasba By Election : कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून महाविकास आघाडीच्या घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची विजय खेचून आणला आहे. विसाव्या फेरीअखेर ११ हजार ४० मतांनी रासनेंचा पराभव केला आहे. पराभवानंतर हेमंत रासनेंनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

कसबा पोटनिवडणुकीतील पराभवावर हेमंत रासने यांनी भाष्य केलं आहे. रासने म्हणाले, भाजपने मला उमेदवारी दिली होती. आम्ही पूर्ण प्रयत्न केले, पण मतदारांनी मला स्वीकारले नाही. मला का स्वीकारले नाही याबाबत मी आत्मचिंतन करेल. या निवडणुकीत मी कमी पडलो आहे. माझ्या दृष्टीने हा निकाल धक्कादायक आहे. 2009 पासून हा संमिश्र असलेला हा मतदार झाला आहे. ही जागा सलग भाजपने जिंकली असली तरी यावेळी तिरंगी लढत झाली आहे असं हेमंत रासने(Hemant Rasane) म्हणाले.

Hemant Rasane
Kasba By-Election : कसब्यात तीन दशकांनंतर इतिहास घडला; पोटनिवडणुकीतच भाजपचा गड खालसा

कसबा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी, त्या भागातल्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करता येईल. मी घरोघरी जाऊ शकत नव्हतो, पण आमची यंत्रणा घरोघरी गेली होती. आमच्या अपेक्षेप्रमाणे हे घडलेलं नाही. नाराजीचा फार फरक पडला असं मला वाटत नाही.

आमची सत्ता होती म्हणून मंत्री दिसत होते. त्यांचेही सर्वच नेते उपस्थित होते. सगळेच पक्ष राजकीय ताकद लावत असतात. मात्र शेवटी प्रचार यंत्रणा राबविली असली तरी लोकांपर्यन्त मी पोहचलो नाही. मी कुठेतरी कमी पडलो असं मला वाटतं. मला यावर थोडं चिंतन करावं लागेल. माझ्या दृष्टीने हा निकाल धक्कादायक आहे. मला विजयाची खात्री होती पण हा निकाल अनपेक्षित असाच आहे असंही रासने यांनी सांगितले.

Hemant Rasane
Ravindra Dhangekar Victory: भाजपनं कसबा गड गमावला; महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकरांचा ऐतिहासिक विजय

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.या चुरशीच्या निवडणुकीत भाजपकडून मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांसह जवळपास डझनभर मंत्री,नेते प्रचारात उतरवले होते. तर काँग्रेस व राष्ट्रवादीकडून देखील माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील कार्यकर्ते, नेत्यांची फौज उभी केली होती.मात्र, तरीदेखील भाजपचा बालेकिल्ला वा पारंपारिक मतदारसंघ राहिलेल्या पेठांमधील लोकांनी यो पोटनिवडणुकीत भाजपच्या हेमंत रासनेंऐवजी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्या पाठीशी असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.

कसबा मतदारसंघ हा भाजपचे वर्चस्व पाहायला मिळाले होते. मात्र, आता पोटनिवडणुकीत पारंपरिक मतदारसंघ राहिलेल्या पेठांनीच भाजपचं टेन्शन वाढवलं आहे. रवींद्र धंगेकर यांना अठराव्या फेरी अखेर ६७९५३ तर रासने यांना ५८९०४ मतं पडली आहे. त्यामुळे धंगेकर यांच्याकडे निर्णायक मतांची आघाडी घेतली होती.

Hemant Rasane
Kasba By-Election : ऐतिहासीक विजयानंतर रवींद्र धंगेकरांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

पहिल्या फेरीपासून रवींद्र धंगेकर यांनी मतमोजणीत आघाडी राखली. ती सातत्याने कमी अधिक प्रमाणात राहिल्याचे पाहायला मिळाले. भाजपचा प्रभाव असलेल्या पेठांमधील फेरीत रासने ही पिछाडी भरुन काढतील असा अंदाज होता. मात्र, त्यात त्यांना अपयश आल्याचं समोर येत आहे. त्यामुळे धंगेकर यांनी दहाव्या फेरीअखेर तेरावी फेरीअखेर ५ हजारांवर मतांनी आघाडीवर होते. अखेरपर्यंत फेरीअखेरही धंगेकर आघाडी कायमच ठेवली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com