पालिका निवडणुकीपूर्वी पिंपरीत भाजपला दिली ताकद; एकनाथ पवारांवर मोठी जबाबदारी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निकटच्या वर्तुळातील ते समजले जातात.
पालिका निवडणुकीपूर्वी पिंपरीत भाजपला दिली ताकद; एकनाथ पवारांवर मोठी जबाबदारी
Chandrakant Patil, Mahesh landge & Eknath pawar Pimpri Latest NewsSarkarnama

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे (BJP) अभ्यासू, आक्रमक, एकनिष्ठ ज्येष्ठ नेते एकनाथ पवार (Eknath Pawar) यांना पक्षाने प्रमोशन दिले आहे. गत टर्मला पिंपरी-चिंचवड महापालिकेत (PCMC) पक्षनेतेपद भुषविलेल्या पवारांची नियुक्ती आता प्रदेश प्रवक्तेपदी करण्यात आली आहे. या संधीचे सोने करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी या नेमणुकीवर 'सरकारनामा'ला दिली. दरम्यान, शहर भाजपचे (BJP) अनेकजण प्रदेशवर विविध पदांवर असले, तरी प्रवक्तेपदी प्रथमच पिंपरी-चिंचवडकर (Pimpri-Chinchwad) भाजपाईची नियुक्ती झाली आहे.

Chandrakant Patil, Mahesh landge & Eknath pawar Pimpri Latest News
AAP ची मुंबई पालिका निवडणुकीत एन्ट्री; भाजपवर केली टीका

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पवारांना आज (ता. ११ मे) कोथरुड, पुणे येथील निवासस्थानी नियुक्तीपत्र दिले. यावेळी पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्ष व भोसरीचे आमदार महेश लांडगे, (Mahesh Landge) माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप, सह निवडणूक प्रभारी संतोष कलाटे, पुणे प्रवक्ते संदीप खर्डेकर उपस्थित होते.

Chandrakant Patil, Mahesh landge & Eknath pawar Pimpri Latest News
लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा; आठवडाभरात मिळू शकतो डिस्चार्ज

अभ्यासू आणि प्रभावी वक्ता अशी पवारांची ओळख आहे. महापालिकेत २०१७ मध्ये भाजपला प्रथमच सत्ता मिळताच जुन्या कार्यकर्त्यांमधून पवार यांना सत्तारुढ पक्षनेतेपदी संधी देण्यात आली. राज्य आणि केंद्रातील दिग्गज नेत्यांच्या संपर्कात असलेले निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जातात. त्यातही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निकटच्या वर्तुळातील ते समजले जातात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.