Chinchwad By Poll Election Result: चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप यांची घोडदौड कायम

Pune Election : कसब्यात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर विजयी
Ashwini Jagtap, Nana Kate, Rahul Kalate
Ashwini Jagtap, Nana Kate, Rahul KalateSarkarnama

Chinchwad Bypoll Election : कसब्यातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा विजय झाला आहे. त्यांना ७२५९९ मते मिळाली तर भाजचे हेमंत रासने (Hemant Rasane) यांना ६१७७१ मते मिळाली. तर चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप यांची १८ व्या फेरीनंतर आघाडी कायम आहे. जगताप या सुमारे ११ हजाराहून मताधिक्यांनी आघाडीवर आहे.

सुरवातीच्या सलग ११ फेऱ्यांत भाजपच्या अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी आघाडी घेतली होती. १२ व्या फेरीत मात्र त्या पिछाडी होत्या. त्यावेळी जगताप या सुमारे नऊ हजार मतांनी आघाडीवर होत्या. आता १८ वी फेरी आहे. यावेळी जगताप यांना ६४०४९ मते, महाविकास आघाडीचे नाना काटे यांना ४९९०७, तर अपक्ष राहुल कलाटे यांना २०६१० मते मिळाली आहेत. यावेळी जगताप तब्बल ११ हजारहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. यानंतर मताधिक्य वाढेल असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला.

Ashwini Jagtap, Nana Kate, Rahul Kalate
Hemant Rasane : कसबा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर हेमंत रासनेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

अश्विनी जगताप म्हणाल्या की, "दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांनी केलेल्या विकासकामांना जनतेने मतदान केले आहे. त्यांच्या प्रेमापोटी मला मते मिळाली आहेत. त्यांनी केलेल्या कामाचीच ही पोचपावती आहे. यापूर्वीही जनतेने लक्ष्मणभाऊ जगताप यांना भरभरून प्रेम केले. ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर होत आहे. आणखी फेऱ्या बाकी आहेत. त्यामुळे लीड वाढेल."

Ashwini Jagtap, Nana Kate, Rahul Kalate
Kasba By-Election : कसब्यात तीन दशकांनंतर इतिहास घडला; पोटनिवडणुकीतच भाजपचा गड खालसा

चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप आणि काँग्रेसचे नाना काटे (Nana Kate) यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. चिंचवड मतदारसंघाची (Chinchwad Bypoll Election) मतमोजणी शंकर आण्णा गावडे कामगार भवनमध्ये सुरु झाली आहे. मतमोजणीच्या एकूण ३७ फेऱ्या होणार आहेत. यासाठी प्रत्येकी १४ टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी एक टेबल असे एकूण १५ टेबल असणार आहेत. १८ पर्यवेक्षक, १८ सहायक आणि १८ सूक्ष्म निरीक्षकांची मतमोजणी कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in