Ashwini Jagtap Victory : चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप ३६ हजार मतांनी विजयी

Chinchwad By Election Result : काटे-कलाटेतील मतविभाजनाचा भाजपला फायदा
Ashwini Jagtap
Ashwini JagtapSarkarnama

Pune By Election Result : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर महिन्यातच चिंचवडची पोटनिवडणूक लागली. त्यानंतर येथे बड्या नेत्यांनी प्रचाराचा धुराळा उडवून राज्याचे लक्ष वेधले. या लक्षवेधी चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार आणि दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांना एक लाख ३५ हजार ४९४ मते मिळाली, तर दुसऱ्या क्रमांच्या राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना ९९ हजार ४२४ मते मिळाली. यात जगताप यांचा ३६ हजार ७० मतांनी विजय झाला आहे. तिसऱ्या स्थानावरील अपक्ष राहुल कलाटे यांना ४० हजार ७५ मते मिळालेली आहेत.

भाजप आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी चिंचवड (Chinchwad) आणि कसब्याची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली होती. कसब्यात महाविकास आघाडीतील काँग्रेसचे रवींद्र धंगेकर तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) विजयी झाल्या आहेत. चिंचवडमध्ये पाच लाख ६८ हजार ९५४ मतदार आहेत. त्यातील दोन लाख ८७ हजार ४७९ जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. येथे ५०.४७ टक्के मतदान झाले.

Ashwini Jagtap
Pune By Poll Election : चिंचवडमध्ये महाविकास आघाडीच्या विजयाला बंडखोर उमेदवारामुळे 'कलाट'णी

या मतमोजणीसाठी ३७ फेऱ्या पार पडल्या. या निवडणुकीत पहिल्यापासूनच अश्विनी जगताप यांचा वरचष्मा पहायला मिळाला. त्यांनी पहिल्या फेरीपासून मतांची आघाडी घेतली होती. २८ व्या फेरीत त्यांनी एक लाख मतांचा टप्पा पार केला होता. उरलेल्या फेऱ्यांतही आपणच आघाडी घेऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार अखेरच्या फेरीपर्यंत त्यांनी आघाडी राखली. त्या ३६ हजार ७० मतांनी विजयी झाल्या आहेत.

दरम्यान, चिंचवडमधील महाविकास आघाडीतील बंडखोरी भाजपच्या पथ्यावर पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून होत आहे. येथे राष्ट्रवादीचे काटे यांना ९९ हजार ४२४ मते अपक्ष कलाटे यांना ४० हजार ७५ मते मिळाली. त्यांच्या मतांची बेरीज एक लाख ३९ हजार ४९९ इतकी होत आहे. कलाटे यांनी बंडखोरी केली नसती तर येथेही महाविकास आघाडीचा विजय झाला असता, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com