मावळात भाजपला मोठे खिंडार; जयंत पाटलांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश

विधानसभेच्या ५४ जागांवरून आपण १०० जागांपर्यंत पोहचू.
BJP workers join NCP
BJP workers join NCPsarkarnama

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थितीत मावळमधील युवा नेते देवाभाऊ गायकवाड नाणे यांच्यासह भाजपमधील अनेकांनी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठी साथ लाभली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत मावळ तालुक्याचे चित्र पालटले. सुनील शेळके यांना लाभलेला जनाशीर्वाद हा इतका मोठा आहे की आता कोणीही तिथे आपला प्रभाव दाखवू शकत नाही. आजचा होणारा पक्षप्रवेश हा लोकांच्या या पाठबळाला अधिक ताकद दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.

BJP workers join NCP
शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर जयंत पाटलांकडूनही औरंगाबादेत चाचपणी

मावळ भागात विकास कामे जोराने सुरू आहेत. सर्वांनी तरुण नेतृत्व स्वीकारले आहे. यात आपण सर्व गट-तट सोडून एकत्र आला आहात. मावळ तालुक्याला काहीही कमी पडणार नाही याची जबाबदारी पुण्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. तेव्हा मावळच्या विकासासाठी आपण आता एकसंघ होऊया, असे आवाहन पाटील यांनी केले. यापुढे सर्वांनी मिळून स्थानिक पातळीवर बूथ कमिट्या सक्षम करण्याचे काम करावे. यातूनच आता असलेल्या विधानसभेच्या ५४ जागांवरून आपण १०० जागांपर्यंत पोहचू, अशा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

BJP workers join NCP
आत्राम कुटुंबाला पवारांची मोठी भेट...

यावेळी संतोष रसाळ, माजी सरपंच उर्से, राशीदभाई सय्यद माजी सरपंच उर्से, महादू सुतार, सरपंच आढे, धोंडीबा सावळे, चेअरमन आढले. किरण गायकवाड, उपसरपंच कांब्रे, नितीन बोडके, उपसरपंच गहुंजे, स्वामी गायकवाड, ग्रा. सदस्य, निवृत्ती वाडेकर, गणेश तिकोणे, उपसरपंच तिकोणा, दत्ताभाऊ सावळे, उपसरपंच दिवड यांच्यासह अनेकांनी पक्षात प्रवेश केला. या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, माजी आमदार विद्या चव्हाण, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com