भेगडे गेले कोल्हापूरला प्रचाराला; तर भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्ते गेले राष्ट्रवादीत

Maval|NCP|Ajit Pawar|Sunil Shelke|Bala Bhegade: नाणे मावळ व पवन मावळातील भाजप कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
Maval NCP, Ajit Pawar
Maval NCP, Ajit PawarSarkarnama

पिंपरी : माजी मंत्री आणि मावळचे (Maval) भाजपचे (BJP) माजी आमदार बाळा भेगडे (Bala Bhegade) हे सध्या विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिव़डणुकीत (Kolhapur By Election) पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात कोल्हापूरात तळ ठोकून आहेत. तर, इकडे मावळातील त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. कॉंग्रेसच्याही (Congress) काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आज (ता.७ एप्रिल) राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यातून मावळात राष्ट्रवादीतील (NCP) इनकमिंग सुरुच राहिले आहे.

Maval NCP, Ajit Pawar
कुणाच्या नादी लागलोय, याचा विचार करा...कारवाई होणारच! परबांचा इशारा

नाणे मावळ व पवन मावळातील भाजप कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादीत प्रवेश केला. मावळ तालुक्यातील राष्ट्रवादीची ताकद दिवसागणिक वाढत असून भाजपला खिंडार पाडण्यात ती यशस्वी होताना दिसते आहे. मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व पक्षाचे मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या पुढाकाराने हे इनकमिंग झाले. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, उमेश पाटील, आमदार शेळके, खांडगे तसेच मावळ तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

Maval NCP, Ajit Pawar
Video: देवेंद्र फडणवीसांची कुठेही बॅक डोर एंट्री नाही; सुधीर मुनगंटीवार

भाजप सहकार आघाडी मावळ अध्यक्ष अमोल सुरेश केदारी, शिवलीचे माजी सरपंच बाळासाहेब आडकर, दिनकर आडकर, सामाजिक कार्यकर्ते अरुण आडकर, मावळ तालुका काँग्रेस प्रवक्ता फिरोज शेख तसेच शाम विकारी, संतोष ढाकोळ, रोशन केदारी, मंगेश केदारी, संतोष येवले, विशाल येवले, रोहित विकारी, राकेश केदारी, संकेत केदारी, उमेश येवले, आदेश केदारी, अक्षय केदारी, विशाल केदारी, सौरव केदारी, अमित सपकाळ, विकी हेंद्रे, विलास कांबळे, नितीन गोणते, सुहास शिंदे, अजय गायकवाड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मागील ३० वर्षे मावळ मतदारसंघात पक्षाला विजय मिळवता आला नव्हता. मात्र शेळके यांच्यामुळे पक्षाचा तेथे प्रचंड विजय मिळवता आला. जनतेने आपल्याला मत देऊन त्यांची जबाबदारी पूर्ण केली. आता आपल्याला विकासकामे करुन आपली जबाबदारी पार पाडायची आहे. सर्वांनी मिळून तालुक्याचा विकास करण्याचा प्रयत्न करु या, असे आवाहन पवार यांनी यावेळी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com