जनतेच्या कल्याणासाठी भाजप योग्य वेळी निर्णय घेणार: भाजप नेत्याचं सूचक विधान

Eknath Shinde| Shrikant Bhartiy| राज्यात मंत्री एकनाथ शिंदेंनी १७ आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारल्याने महाविकास आघाडीत शिवसेनेची अडचण झाली आहे.
जनतेच्या कल्याणासाठी भाजप योग्य वेळी निर्णय घेणार: भाजप नेत्याचं सूचक विधान
Eknath Shinde| Shrikant Bhartiy|

पुणे : राज्यात मंत्री एकनाथ शिंदेंनी १७ आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारल्याने महाविकास आघाडीत शिवसेनेची अडचण झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे खाजगी सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) हे सध्याच्या परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेसाठी (Shivsena) एसंकटमोचक ठरण्याची शक्यता आहे.

या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिती पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''आम्ही नाराजी व्यक्त करुन झाल्यावर एकनाथ शिंदेनी नाराजी व्यक्त करणं म्हणजे सत्तेची फळे चाखुन झाल्यावर नाराजी व्यक्त करणं हे एकनाथ शिंदेंना शोभणारं नाही...!असं म्हणत महाविकास आघाडीतील नाराजी नाट्याचा खेडचे आमदार दिलीप मोहितेपाटलांनी चांगलाच समाचार घेतला. आज आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त दिलीप मोहिते पाटील आले होते. यावेळी त्यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीवर प्रतिक्रिया दिली.

Eknath Shinde| Shrikant Bhartiy|
नार्वेकरांपुढे शिवसेना अन् ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद वाचविण्याचे आव्हान : संकटमोचक ठरणार?

तर दूसरीकडे भाजपचे नवनिर्वाचित आमदार श्रीकांत भारतीय यांनी देखील या घडामोडींवर भाष्य केलं आहे. 'विधानपरिषदेत झालेल्या विजयाच्या आनंदासाठी माऊलींपुढे नतमस्तक होण्यासाठी मी इथे आलो आहे. पण कालच्या विजयानंतर ते आजपर्यंत महाविकास आघाडीत जे नाराजी नाट्य सुरु झाले आहे, ते आता महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा आनंद वाटावा अशी स्थिती महाराष्ट्रात निर्माण होत चालली आहे. आमचा डीएनए हा सामान्य माणसाच्या प्रश्नांच्या लढ्याकरता आहे. हा कोणत्याही माणसाच्या किंवा पक्षाच्या विरोधात नाही.

एकनाथ शिंदेंची व्यवस्था भाजपने केली आहे का, असा सवाल विचारला असता श्रीकांत भारतीय म्हणाले की, एकनाथ शिंदे त्यांची व्यवस्था करण्यास समर्थ आहेत आणि हा शिवसेनेचा अंतर्गत मामला आहे. परिस्थितीच्या अनुरुप भाजप जनतेच्या कल्याणासाठी सर्व योग्य ते निर्णय घेणार असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे.

ठाकरे कुटूंबाने गेली तीन पिढ्या जनतेला मोठं काढण्यासाठी घालवली, पण आता ठाकरे कुटूबाला संधी मिळाली आहे तर त्यांना असा त्रास देणं हे फार इष्ट आहे, असं मला वाटतं नाही. या मागे केंद्रीय शक्तींचा हात आहे असं मला वाटतं. पण एकनाथ शिंदेंची नाराजी दूर होईल आणि महाविकास आघाडी पुन्हा एकदा जनतेच्या सेवेत येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in