पिंपरीत भाजपची सत्ता पुन्हा येणार का...? उमा खापरे म्हणाल्या...‘ऑफ कोर्स येणार!’

पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजप पुन्हा सत्तेत येईल : उमा खापरे
Uma Khapre
Uma KhapreSarkarnama

पिंपरी : राज्यातील गेल्या नऊ दिवसांची राजकीय कोंडी अखेर बुधवारी (ता. २९ जून) फुटली. महाविकास आघाडी (mahavikas Aghadi) सरकार जाऊन आता शिवसेना (shivsena) बंडखोर आणि भाजपचे (bjp) सरकार येणार आहे. राज्यातील या सत्तातरांमुळे आगामी महापालिका निवडणुकीचीही समीकरणे आता बदलली जाणार आहेत. राज्यात पुन्हा सत्तारुढ झाल्याने पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) महापालिकेतही पुन्हा सत्तेत येणार असल्याचा दावा भाजपने आज नव्याने केला. नाट्यमय सत्तात्तरांतून राज्यात भाजप पुन्हा सत्तेत आल्यामुळे पिंपरी पालिकेतही पक्ष पुन्हा सत्तेत येणार का? अशी विचारणा नवनिर्वाचित आमदार उमा खापरे (Uma Khapre) यांना केली असता, ‘ऑफ कोर्स, येणारच,’ असे ठाम उत्तर त्यांनी दिले. (BJP will return to power in Pimpri Chinchwad Municipal Corporation : Uma Khapre)

पिंपरी पालिकेत मुख्य लढत ही भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही माजी सत्ताधाऱ्यांमध्येच आहे. राष्ट्रवादीची १५ वर्षांची राजवट संपवून २०१७ ला भाजप प्रथमच बहुमताने पिंपरी पालिकेत सत्तेत आली. तिने २०२२ ला शंभर प्लसचा नारा देत पुन्हा सत्तेत येण्याचा दावा शहरातील तीनपैकी आपल्या दोन आमदारांच्या ताकदीवर अगोदर केला होता. कारण, त्यांच्या बळावरच २०१७ ला भाजप पालिकेत सत्तेत आली होती. मात्र, राज्याच्या सत्तेतील राष्ट्रवादीचा या भाजपच्या घोषणेला मोठा अडसर होता. त्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांनीच जातीने पिंपरीच्या निवडणुकीत लक्ष घातल्याने भाजपला सत्ता राखण्यात अडथळा निर्माण झाला होता. पण, आता राज्यातच सत्ताबदल झाला. तेथे भाजप पुन्हा सत्तेत आला. त्यामुळे पिंपरी पालिकेतही पुन्हा सत्ता मिळविण्याचा त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.

Uma Khapre
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघेच १ जुलै रोजी शपथ घेणार

दरम्यान, याच महिन्यात भाजपच्या पथ्यावर पडणारी आणखी एक घटना घडली आहे. त्यातून पिंपरी भाजपला आणखी ताकद मिळाली आहे. शहरात भाजपला तिसरा आमदार मिळाला. वीस जूनच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पिंपरी चिंचवडकर उमा खापरे निवडून आल्या आहेत. त्या शहराच्या पहिल्या महिला आमदार ठरल्या आहेत. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा असल्याने त्यांच्या पक्ष संघटनेच्या कौशल्याचा व अनुभवाचा पक्षाला पिंपरी पालिका निवडणुकीत फायदा होणार आहे.

Uma Khapre
दीपक केसरकरांनी फोडले संजय राऊतांच्या डोक्यावर खापर : काँग्रेस व राष्ट्रवादीवरही आरोप

नाट्यमय सत्तात्तरांतून राज्यात भाजप पुन्हा सत्तेत आल्यामुळे पिंपरी पालिकेतही पक्ष पुन्हा सत्तेत येणार का? अशी विचारणा केली असता, ‘ऑफ कोर्स, येणारच,’ असे ठाम उत्तर खापरे यांनी आज (ता. ३० जून) ‘सरकारनामा’ला दिले. आता पक्षाचे दोन नाही, तर तीन आमदार शहरात झाल्याने पिंपरी पालिकेत पुन्हा सत्तेत येऊच, असे त्या ठामपणे म्हणाल्या. गेल्या पाच वर्षांत भोसरीचे आमदार महेश लांडगे व चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वात शहरात झालेली विकासकामे पाहता पिंपरी-चिंचवडकरच आम्हाला पुन्हा सत्ता देणार आहेत, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. दुसरीकडे, राज्यातील सत्ता गेल्याने राष्ट्रवादीची पिंपरी पालिकेत पुन्हा सत्तेत येण्याची वाट काहीशी बिकट झाली आहे, असे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com