आमदार सिद्धार्थ शिरोळेंवर विमानतळासंदर्भात भाजप देणार मोठी जबाबदारी!

पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या जागेला संरक्षण विभागाकडून परवानगी नाकारण्यात आली.
Siddharth Shirole-Chandrakant Patil
Siddharth Shirole-Chandrakant Patilsarkarnama

पुणे : पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत धावपळ करण्यासाठी कोणीतरी माणूस लागतो. मी आमचे तरुण आमदार सिद्धार्थ शिरोळे (Siddharth Shirole) यांना यासाठी आग्रह धरणार आहे. कारण समाजालाही याबाबतची माहिती मिळायला हवी, असे सांगून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी विमानतळाबाबत पक्षीय पातळीवर आमदार शिरोळे यांच्यावर मोठी जबाबदारी येणार असल्याचे स्पष्ट केले. (BJP will give responsibility to Siddharth Shirole for work in Delhi regarding Purandar airport)

पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या जागेला संरक्षण विभागाकडून परवानगी नाकारण्यात आल्यानंतर पुण्यात आज (ता. ८ जानेवारी) एक बैठक घेण्यात आली. त्या बैठकीनंतर माध्यमाशी बोलताना आमदार पाटील यांनी शिरोळेंच्या जबाबदारीबाबत भाष्य केले.

Siddharth Shirole-Chandrakant Patil
आमदार महेश लांडगेंचा डाव अमोल कोल्हेंनी त्यांच्यावरच उलटवला!

चंद्रकांत पाटील म्हणाले की, पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या जागेला परवानगी नाकारल्याचे हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे पत्र खासदार गिरीश बापट यांना आले आहे. त्यामुळे सर्वांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. त्यानंतर यासंदर्भातील एक बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत परवानगी का नाकारण्यात आली याची चर्चा झाली. त्यातून अनेक विषय समोर आले आहेत. त्यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे भूसंपादनास शेतकऱ्यांचा होत असलेला विरोध. बागायती जमिनी असल्यामुळे विरोध होणे हे साहजिकच आहे.

Siddharth Shirole-Chandrakant Patil
जयंत पाटलांना त्या स्वागताचे अप्रूप! : पोस्ट लिहित म्हणाले...

जागेसंदर्भात मोठ्या कुशलतेने निर्णय घ्यावा लागेल. या विषयातील तज्ज्ञ, दिल्लीतील निवृत एअर मार्शल गोखले यांनीही याप्रश्नासंदर्भात वेळ द्यावा, यासाठी त्यांना विनंती करण्यात येणार आहे. आमचे तरुण आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना मी आग्रह धरणार आहे की, विमानतळाबाबत धावपळ करणारा कोणीतरी माणूस लागतो. कारण समाजालाही याबाबतची माहिती मिळणे आवश्यक असते, असे सांगून विमानतळाबाबत सिद्धार्थ शिरोळे यांच्यावर भाजपकडून जबाबदारी देण्याचे संकेत चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले. त्यासाठी मीही प्रयत्न करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com