चंद्रकांतदादा म्हणतात, पुण्यात गिरीशभाऊच कारभारी!

महापालिकेची आगामी निवडणूक भाजप कुणाच्या नेतृत्त्वाखाली लढणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते.
bjp will contest pmc election in girish bapat leadership says chadrakant patil
bjp will contest pmc election in girish bapat leadership says chadrakant patil

पुणे : पुणे महापालिकेची (PMC) आगामी निवडणूक पुण्याचे खासदार आणि माजी मंत्री गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या नेतृत्त्वाखाली लढवण्यात येणार आहे. भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज ही घोषणा केली. यामुळे गिरीश बापट हेच पुण्यातील (Pune) भाजपचे कारभारी असतील, हे अखेर स्पष्ट झाले आहे. 

दिव्यांग आणि अंथरुणाला खिळून असलेल्या व्यक्तींना घरोघरी जाऊन कोरोना लस देण्याचा उपक्रम कसबा विधानसभा मतदारसंघात राबवण्यात येत आहे. या मोहिमेची सुरवात आज पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महापालिका निवडणुकीबाबत घोषणा केली. या कार्यक्रमाला खासदार गिरीश बापट, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, राजेश पांडे आणि स्थानिक नगरसेवक आदी उपस्थित होते. 

महापालिकेचा विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाळ पुढील वर्षी १५ फेब्रुवारीला संपणार आहे. यामुळे पुढील वर्षीच्या जानेवारी अखेरीस महापालिकेची निवडणूक होईल, अशी शक्यता आहे. परंतु, महापालिकेची आगामी निवडणूक भाजप कुणाच्या नेतृत्त्वाखाली लढणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. याचबबरोबर भाजप कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण  निर्माण झाले होते. पाटील यांच्या या घोषणेमुळे या सर्व चर्चेवर पडदा पडला असून, पुण्यात गिरीश बापट हेच कारभारी असतील, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com