भाजपाला मोठा धक्का बसणार वडगाव शेरीतच !

प्रभाग रचनेवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसवर प्रचंड टीका होत आहे.
भाजपाला मोठा धक्का बसणार वडगाव शेरीतच !
Mulik-Tingre-JagtapSarkarnama

पुणे : भारतीय जनता पार्टीतून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या नरगेसवकांची संख्या शहरात मोठी असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेषत: वडगाव शेरी मतदारसंघातील भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करतील,असे सांगण्यात येत असून केवळ आरक्षण जाहीर होण्याची वाट अनेकजण पाहात असल्याचे राष्ट्रवादीतील सूत्रांनी सांगितले.

Mulik-Tingre-Jagtap
आमच्यातील काही गद्दार शत्रूपक्षाला मिळाले : खेडमधील सत्तांतर आढळराव विसरेनात!

भाजपाला सर्वात मोठा धक्का वडगाव शेरीतच बसणार असल्याचे या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.या मतदारसंघात सध्या २४ नगरसेवक आहेत.यापैकी १४ नगरसेवक भाजपाचे आहेत.राष्ट्रवादीचे सहा तर शिवसेनेचे तीन नगरसेवक आहेत.‘एमआयएम’चा एक नगरसेवक निवडून आला आहे. नव्या प्रभाग रचनेनुसार या मतदारसंघात आता २४ ही नगरसेवकांची संख्या वाढून २७ झाली आहे. वाघोली व लोहगाव या दोन गावांचा समावेश महापालिकेत झाल्याने नगरसेवकांची संख्या वाढली आहे. भाजपाच्या १४ पैकी बहुसंख्य नगरसेवक उमेदवारी मिळविण्यासाठी गेल्या निवडणुकीआधी भाजपात दाखल झाले होते.

Mulik-Tingre-Jagtap
आमदार मोहितेंचा शिवसेना-भाजपला दणका; माजी उपनगराध्यांसह गोरे गटाचे कट्टर समर्थक राष्ट्रवादीत

प्रभाग रचनेवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसवर प्रचंड टीका होत आहे. संपूर्ण प्रभाग रचना भाजपाच्या अडचणीची करून ठेवल्याचे बोलले जात आहे. महापालिकेत सत्तेत यायचेच या दृष्टीने राष्ट्रवादीने प्रभाग रचना केल्याचा आरोप करण्यात येत आहे.अर्थात काहीही झाले तरी पुन्हा सत्ता काबीज करायचीच असा चंग भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी बांधला असून त्यादृष्टीने त्यांच्याकडूनही तयारी करण्यात येत आहे.

वडगाव शेरी हा विधानसभा मतदारसंघात मोडणारा सारा भाग सुरवातीपासून कॉंग्रेसचा व नंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो.मात्र, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जगदीश मुळीक यांनी या मतदारसंघातून आमदारकी खेचून आणत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बापू पठारे या दिग्गज आमदारांना चितपट केले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार गिरीश बापट यांना या मतदारसंघातून तब्बल ५७ हजार मतांचे अधिक्य मिळाले होते.मात्र, याचवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत जगदीश मुळीक यांना राष्ट्रवादीच्या सुनील टिंगरे यांच्याकडून पाच हजार मतांनी पराभूत व्हावे लागले. गेल्या दोन वर्षात आमदार टिंगरे यांनी हा मतदारसंघ बराच पोखरल्याचे दिसत असून महापालिका निवडणुकीच्या निकालातून ते स्पष्ट होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in