पिंपरी पालिका आयुक्तांविरुद्ध भाजपने दिला अविश्वास ठरावाचा इशारा

पिंपरी-चिंचवड भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि पालिका आयुक्त राजेश पाटील (Rajesh Patil) यांच्यावर टीका केली आहे.
PCMC Mayor Usha Dhore

PCMC Mayor Usha Dhore

Sarkarnama

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका (PCMC) आयुक्त राजेश पाटील (PCMC Commissioner Rajesh Ptil) हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) दबावाखाली काम करीत आहेत. तसेच, त्यांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपला (BJP) बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे, असा खळबळजनक आऱोप भाजपच्या महापौर माई ऊर्फ उषा ढोरे (PCMC Mayor Usha Dhore)व सभागृहनेते नामदेव ढाके (Namdev Dhake) यांनी बुधवारी (ता.15 डिसेंबर) पत्रकारपरिषद घेऊन केला.

<div class="paragraphs"><p>PCMC Mayor Usha Dhore</p></div>
भाजपने त्यांची जागा ओळखून रहावे, नाना संतापले..

अडवा आणि जिरवा असे धोरण त्यांनी भाजपबाबत अवलंबले असून ते त्यांनी थांबवले नाही, तर त्यांच्याविरुद्ध मोर्चा काढून अविश्वास ठराव आणू, असा इशाराही या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. आयुक्त ऐकत नसल्याचे सांगत महापौरांनी त्रागा केल्याचे यावेळी दिसून आले. आय़ुक्त हे शहराचे मालक आहेत का? अशी उद्विग्न विचारणा त्यांनी केली. त्यांचा मनमानी कारभार सुरु आहे, असे त्या म्हणाल्या. स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेने (GB)ठराव मंजूर करूनही आय़ुक्त त्याची अंमलबजावणी करीत नसल्याने भाजप घायकुतीला आल्याचे पहायला मिळाले.

कोरोना काळात आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबाला प्रत्येकी तीन हजार रुपये मदत देणे, पालिका शाळेत शिकणाऱ्या मुलांना टॅब देणे आणि महिलांना ड्रायव्हिंग प्रशिक्षण देणे अशा जनहिताच्या स्थायी व जीबीने मंजूर केलेल्या विषयांची आयुक्तांनी अद्याप अंमलबजावणी केली नसल्याबद्दल महापौरांनी संताप व्यक्त केला. तर, भाजपला अडवा आणि जिरवा असे काम आयुक्त करीत असल्याचा हल्लाबोल ढाके यांनी केला. महासभेच्या ठरावालाही त्यांनी केराची टोपली दाखवली आहे, अशा शब्दांत त्यांनीही महापौरांप्रमाणेच संताप व्यक्त केला.

<div class="paragraphs"><p>PCMC Mayor Usha Dhore</p></div>
श्रीनिवास पाटील म्हातारे झाल्याने पुढचा खासदार नितीनकाकाच व्हावेत! राष्ट्रवादीच्या नेत्याचा बॉम्ब

आय़ुक्तांमार्फत भाजपला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरु आहे, असा आरोप त्यांनी केला. कामच होऊ नयेत म्हणून त्यांनी स्थायी समितीत प्रस्ताव जाण्यापूर्वी त्याच्या छाननीसाठी समिती स्थापन केल्याचा दावा त्यांनी केला. मी पणाचा त्यांना गर्व झाला आहे. कामे अडवून ते लोकप्रतिनिधींचा अपमान करीत आहेत, असे ते म्हणाले. तसेच, तुम्ही पाहूणे आहात, असेही त्यांनी आयुक्तांना सुनावले.

दरम्यान, या आऱोपांवर आयुक्तांची बाजू ऐकण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही. आयुक्तानंतर ढाके यांनी विरोधी पक्ष राष्ट्रवादीचाही समाचार घेतला. शहराला पाणीपुरवठा करणारे मावळातील पवना धरण भरूनही गेल्या दोन वर्षापासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. त्यामुळे भाजप व प्रशासनाच्या विरोधात बुधवारी (ता.15 डिसेंबर) राष्ट्रवादीने महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशव्दारावर आंदोलन केले. त्यावर बोलताना शहराच्या या पाणीसंकटाला राष्ट्रवादीच जबाबदार असल्याचा आऱोप ढाकेंनी केला. आंद्रा धरणातून त्यासाठी पाणी आणण्याचे काम आम्ही सुरु केले असून ते 95 टक्के पूर्णही झाल्याने लवकरच शहरात नियमित पाणीपुरवठा होईल, असा दावाही त्यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com