विधान परिषद निवडणूक : मु्क्ता टिळक ऍम्ब्युलन्सने मतदानाला जाणार

राज्यसभा निवडणुकीला तब्येत बरी नसताना सुद्धा टिळक, जगताप यांनी मतदान केलं होतं.
Mukta Tilak-Laxman Jagtap-Devendra Fadnavis
Mukta Tilak-Laxman Jagtap-Devendra Fadnavisfile photo, Sarkarnama

पुणे : पुण्यातील आपले दोन आजारी आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) आणि मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांना मुंबईत विधानपरिषद निवडणुकीला (Legislative Council elections) आणण्यासाठी भाजप (BJP) प्रयत्नशील आहे. (Mukta Tilak latest news)

जगताप हे भाजपचे पिंपरी-चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार आहेत. टिळक या पुण्यातील कसबापेठ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भाजपच्या आमदार आहेत.जगताप आणि टिळक दोघेही गंभीर आजारी आहेत.

आमदार मु्क्ता टिळक या ऍम्ब्युलन्सने उद्या (ता. २०) मुंबईत जाऊन विधान परिषदेसाठी मतदान करणार आहेत, अशी माहिती भाजपकडून देण्यात आली. राज्यसभा निवडणुकीला तब्येत बरी नसताना सुद्धा टिळक, जगताप यांनी मतदान केलं होतं.

"आमदार लक्ष्मण जगताप यांच्या बाबतीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्यांच्या कुटुंबीयांशी बोलत आहेत. जगताप हे सोमवारी पोचतील आणि मतदान करतील," असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.फडणवीस यांनी राज्यसभेतील भाजपचे यश जगताप आणि टिळक यांच्या प्रयत्नांना समर्पित केले.फडणवीसांनी टिळक, जगताप यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली होती.

Mukta Tilak-Laxman Jagtap-Devendra Fadnavis
Vidhan Parishad Election 2022 : आमदार फुटू नयेत म्हणून शिवसेनेकडून व्हिप जारी

राज्याच्या विधानसभेत भाजपचे 106 आमदार आहेत. स्वतःच्या आमदारांव्यतिरिक्त, पक्षाला बाहेरून 24 आमदारांचा पाठिंबा लागेल. विधान परिषद निवडणुकीत सर्व पाच उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला 130 मतांची आवश्यकता आहे.

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाकारण्यात आल्यानं विजयासाठी लागणाऱ्या मतांचा कोटा कमी झाला आहे. तरीही काँग्रेस आणि भाजपसमोर जास्तीचा एक उमेदवार निवडून आणण्याचं आव्हान कायम आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी गुप्त मतदान असल्यानं राजकीय पक्षांकडून सावधगिरी बाळगली जात आहे. स्वतः पक्षातील आमदारांबरोबरच समर्थन देणाऱ्या आमदारांची मतं आपल्यालाच मिळतील यासाठी प्रयत्न केले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com