सुजय विखे, पडळकर, राम सातपुते भाजपची तगडी टीम मैदानात उतरणार

#Sarkarnama #cricketnama आजपासून 'क्रिकेटनामा' रंगणार
Sujay Vikhe,  Gopichand Padalkar, Ram Satpute
Sujay Vikhe, Gopichand Padalkar, Ram Satpute sarkarnama

पुणे : राजकीय आखाड्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे, 'राजकीय डाव' टाकणारे नेते आज समोरासमोर भिडणार आहेत. एकमेकांवर टीका करीत फटकेबाजी करणारी ही नेतेमंडळी आज कुणाची विकेट घेणार, कुणाला गुगली टाकणार, याकडे सगळ्याचे लक्ष लागलं आहे. निमित्त आहे सरकारनामाच्या 'क्रिक्रेटनामा'स्पर्धेचे. (Sarkarnama cricketnama matches in Pune)

भारतीय जनता पक्ष (bjp), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (ncp), शिवसेना (shivsena), महाराष्ट्र नवनिर्माण सेना (mns), आम आदमी पार्टी या राजकीय पक्षांच्या संघाबरोबरच आयएएस आणि आयपीएस अधिकारीही 'क्रिक्रेटनामा'साठी सज्ज झाले आहेत. 'सरकारनामा' वेबपोर्टलच्या वतीने आजपासून दोन दिवस 'क्रिकेटनामा' या आगळ्या राजकीय-प्रशासकीय लीगचे आयोजन करण्यात आले आहे.

Sujay Vikhe,  Gopichand Padalkar, Ram Satpute
मिलिंद नार्वेकर थेट भाजप, राष्ट्रवादीशी पंगा घेणार

भाजपने या सामन्यासाठी कंबर कसली आहे. अहमदनगरचे युवा खासदार सुजय विखे (Sujay Vikhe), राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सतत टीका करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), भाजपचे डॅशिंग आमदार राम सातपुते (Ram Satpute) अशी भाजपची तगडी टीम मैदानात उतरणार आहे.

Sujay Vikhe,  Gopichand Padalkar, Ram Satpute
Sarkarnama-Cricketnama : मुंडे, पटोले, विश्वजित, नार्वेकर भिडणार मैदानावर

राष्ट्रवादीच्या संघात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह आमदार आशुतोष काळे, अनिकेत तटकरे, सुनील टिंगरे हे आमदार खेळणार आहेत. काँग्रेसच्या संघात विश्वजित कदम, आमदार संग्राम थोपटे, अमित झणक, संजय जगताप मैदानात उतरणार आहेत. भाजपकडून विखे, पडळकर, शिंदे, महेश लांडगे, सिद्धार्थ शिरोळे, राम सातपुते आपले कसब दाखवणार आहेत.

Sarkarnama cricketnama matches in Pune
Sarkarnama cricketnama matches in Punesarkarnama

मनसेकडून आमदार राजू पाटील

शिवसेनेकडून सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार ओम राजेनिंबाळकर, धैर्यशील माने, आमदार अंबादास दानवे, सचिन अहिर संघात असतील. मनसेकडून आमदार राजू पाटील यांच्यासह अनेक नेते उतरणार आहेत. आयएएस संघाचे नेतृत्व पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव आणि आयपीएस संघाचे नेतृत्व पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता करणार आहेत.

खेळाडूंच्या जर्सीचे अनावरण

नुकतेच या स्पर्धेनिमित्त खेळाडूंच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. या स्पर्धांच्या निमित्ताने झालेल्या जर्सी अनावरण कार्यक्रमात राजकीय नेत्यांची जुगलबंदी रंगली. प्रत्यक्ष मैदानावर खेळण्याआधीच जिंकण्याचा दावा सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी केला आहे.

cricketnama लाईव्ह स्ट्रिमिंग

पाषाण रोड, सूस येथील 'सनीज् वर्ल्ड'च्या मैदानात हे बाॅक्स क्रिकेटचे सामने रंगणार आहेत. ता.२८ व २९ मे रोजी दुपारी ४ ते रात्री १० या वेळात हे सामने खेळवले जाणार आहेत. सरकारनामा, ई-सकाळ, साम टिव्ही या तिन्ही वेब पोर्टलच्या फेसबुक पेजवरून तसेच यु ट्यूब चॅनेलवरुन या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रिमिंग केले जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com