
Pune BJP : केंद्रातील मोदी सरकारला जवळपास नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या विविध योजनांचा प्रचार करण्यासाठी आणि आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राज्यभर घटनात्मक कार्यक्रम राबविण्यासाठी भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
ही बैठक गुरुवारी (ता.१८) पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. यावेळी या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे इतर वरिष्ठ नेतेही उपस्थित राहणार आहेत.
यावेळी दिवसभरात तीन बैठका होणार असून भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी राज्यभरातून बाराशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत विविध संघटनात्मक आणि राजकीय ठराव संमत करण्यात येणार आहेत. तर त्याच घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू ॲडोटेरियममध्ये आमदार, खासदारांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर मंत्रीगटाची स्वतंत्र जे.पी.नड्डा घेणार आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली. प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर भाजपतर्फे नियोजन केले जात आहेत.
(Edited By- Ganesh Thombare)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.