केतकी चितळेवरचा राग आंबेकरांवर निघाला... राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दोन लगावल्या...

भाजपचे (BJP) प्रवक्ते विनायक आंबेकर (Vinayak Ambekar) यांनीही शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती.
केतकी चितळेवरचा राग आंबेकरांवर निघाला... राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दोन लगावल्या...
Vinayak Ambekarsarkarnama

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर विखारी टीका करणारी कविता अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitale) हिने शेअर केली होती. त्यावरुन राजकारण तापले आहे. त्यातच भाजपचे (BJP) प्रवक्ते विनायक आंबेकर (Vinayak Ambekar) यांनीही पवार यांच्यावर दोन दिवसापूर्वी आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. त्यावरुन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंबेकर यांना मारहाण केली.

आंबेकर यांनी दोन दिवसाआधी फेसबुकवर पवार यांच्या विरोधात पोस्ट केली होती. त्यामुळे आंबेकर यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही नोंदवण्यात आली होती. आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. त्यामुळे केतकी चितळेवरचा राग आंबेकरांवर निघाला असल्याची चर्चा रंगली आहे. "माझी पण कवीता असे म्हणत आंबेकर यांनी लिहिले होते की ''भांडणे लावुन थकलो तरी समाधान नाही, मी प्रदीर्घ पदावरी होतो काही करु शकलो नाही. मी फक्त नारद कळीचा कोणी बाप म्हणत नाही. मी बाप म्हणतो स्वतःला कारण मनी समाधान नाही. माझा पुतण्या अन् नातु माझेच ऐकत नाही. तो देव साल्यानो तुमचा मला नेत पण नाही,'' अशी जहरी टीका आंबेकर यांनी केली होती.

Vinayak Ambekar
'शरद पवार आमचा बाप, त्यांच्यासाठी मंत्रीपद गेलेतरी बेहत्तर'

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंबेकर यांना मारहान केल्यानंतर अंकुश काकडे (Ankush Kakade) यांनी त्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. काकडे म्हणाले, शाब्बास कसब्यातील राष्ट्रवादीच्या मावळ्यांनो, आंबेकर यांनी पवार साहेबांवर फेसबुक वर गालिच पोस्ट केली होती. त्या संदर्भामध्ये आज सकाळी विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये अंकुश काकडे, मृणाल वाणी, गणेश नलवडे यांनी रीतसर तक्रार केली होती.

मात्र, तेथे जमलेले कार्यकर्ते म्हणाले केवळ पोलिसात तक्रार करून चालणार नाही. या आंबेकरला धडा शिकवलाच पाहीजे. तेथून ते तडक शुक्रवार पेठेतील आंबेकर यांच्या कार्यालयांमध्ये गेले आणि त्या ठिकाणी आंबेकरला यथेच्छ चोप दिला. हे सर्व करण्यामध्ये अध्यक्ष गणेश नलावडे कार्याध्यक्ष दिपक पोकळे, रोहन पायगुडे, दीपक जगताप, संतोष जोशी, अजिंक्य पालकर, राजेंद्र आलामखांने, प्रसाद गावडे मात्र आप्पा जाधव याने त्याच्या कानाखाली लगावली. इथून पुढे अशा प्रकारची जे कोणी पवार साहेबांच्या विरुद्ध पोस्ट करेल त्याला अशाच प्रकारची वागणूक दिली जाईल, याची गंभीर दखल पवार साहेब विरोधकांनी घ्यावी, असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे.

दरम्यान, या संदर्भात आंबेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, मी माझ्या सोशल मीडियावर एक कविता लिहिली होती. त्या कवितेत मी कोनाच्याही नावाचा उल्लेख केला नव्हता. त्या कवितेतील शेवटच्या दोन-तिन ओळी मी मागे घेतल्या होत्या. तरी देखील आज माझ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आप्पासाहेब जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला मारहाण केली, असा दावा आंबेकर यांनी केला आहे.

Vinayak Ambekar
ठाणे, पुण्यानंतर पिंपरीतही केतकी चितळेंविरुद्ध पोलिसांत तक्रार

तसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या सांगण्यावरून आप्पासाहेब जाधव यांनी मला अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप आंबेकर यांनी केला आहे. माझ्यावर झालेल्या हल्ल्याने मी आणि माझ्या पक्षातील कोणताही कार्यकर्ता घाबरणार नाही. तसेच आम्ही सोशल मीडियावर लिखाण करण देखील थांबवणार नाही...असे ही आंबेकर यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जसा अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा अधिकार आहे. तसाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य अधिकार आम्हालाही आहे. त्यामुळे आम्ही शरद पवार यांच्या विरोधात सोशल मीडियावर लिहत राहणार असा, दावा आंबेकर यांनी केल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.